सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती संदर्भ संबंधित यंत्रणा आणि जनतेने घ्यावयाची खबरदारी- उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी .

उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी .

Sudarshan MH
  • Oct 15 2020 4:01PM

 

नांदेड दि.१५(अरविंद जाधव)प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि. 13/10/20 ते दि. 17/10/20 या काळातील मराठवाड्यातील नांदेड जिल्हा चा समावेश आहे. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे.

यासंदर्भात उपाययोजना म्हणून सर्व जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. यासाठी जनतेने खालील उपाय करावे अशी सूचना करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी विजेच्या कडकडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास घराच्या बाहेर जाणे टाळावे जरा मोकळ्या जागेत असाल जवळपास  कुठेच सुरक्षित इमारतीचा सहारा नसेल त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्याची करावे.आकाशात विजा चमकत असतील तर घरात सहारा घ्यावा घरा बाहेर कुठे थांबू नये आपल्या घरात कोणती उपकरणे चालू असतील तर त्वरित बंद करावे, तारेचे किंवा लोखंडी खांब व इतर लोखंडी वस्तू पासून दूर रहा, पाण्याच्या जवळ थांबू नका,

आकाशात विजा चमकत असतील तर घरातील फोनचा वापर करू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील पाईप लाईन ला स्पर्श करू नका, तसेच विद्युत उपकरणाचा वापर करू नका विजेचा गडगडाट वादळी वारे चालू असताना लोखंडी धातू यांनी उभारलेल्या तंबूत आसरा घेऊ नका, जातीच्या मनोरे जवळ उभे राहू नका, पक्कं घरात असेल तर वीज पडताना  बाहेर डोकावून बघू नका ही सर्वात धोकादायक आहे. अशा प्रकारची  सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांनीपत्रका द्वारे  कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार