नांदेड दि.१४(अरविंद जाधव)21 लाख रुपये वर दक्षीणा, 21 तोळे सोने आणि 1 लाख रुपये दुचाकी गाडी घेण्यासाठी ऐवढा हुंडा घेतल्यानंतर सुध्दा विवाहितेला 10 लाखासाठी त्रास देणाऱ्या शिक्षकाविरुध्द आणि त्याच्या कुटूंबियांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
28 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न दिपक गोविंद ढगे यांच्यासोबत झाले होते. दिपक ढगे हे कळमनुरी तालुक्यात जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहेत. लग्न करतांना खुप मोठी रक्कम, सोने घेवून लग्न केले होते. तरीपण भूखंड खरेदी करण्यासाठी दिपक ढगे आणि त्यांचे इतर नातलग विवाहितेला 10 लाख रुपये माहेरवरून आण यासाठी कु्रर वागणूक देत होते. आपल्याला होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या वडीलांकडून 5 लाख रुपये शिक्षकाच्या कुटूंबियांना दिले. तरी पण त्यांची पैशांची भुक भागलीच नाही.
या विवाहित जोड्याला एक मुलगा असून ती दुसऱ्यांदा गर्भवती असतांना बाळ नकोच म्हणून दररोज तिला मारहाण केली जात होती. मारहाणीमुळे तिला रक्तस्त्राव झाला. तेंव्हा तीला बाळाची तपासणी करायची आहे म्हणून दवाखान्यात नेले आणि तिच्या इच्छेविरुध्द डॉक्टरांना खोटे सांगून तिचा गर्भपात घडवून आणला. विवाहितेच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी दिपक गोविंद ढगे या नवऱ्यासह एकूण 9 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ), 323, 34 नुसार गुन्हा क्रमांक 367/2020 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सुरेश नरवाडे करीत आहेत.
या घटनेसह पोलीस जप्तरी देगलूर,शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण याठिकाणी सुध्दा विवाहितांवर अत्याचारांचे गुन्हे नोंद झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये सुध्दा लाखो रुपयांची मागणी विवाहितांच्या सासरच्या मंडळींनी केली आहे. पण पहिल्या प्रकरणातील नवरा हा शिक्षक असल्याने त्या प्रकरणाला सर्वात जास्त महत्व आहे. ज्यांच्यावर समाजाला शिक्षण देण्याची जबाबदारी आहे त्यांच्या घरातच असे होत असेल तर समाजाने त्यांच्याकडून कोणत्या शिक्षणाची अपेक्षा करावी.