सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिक पाहाणी व शेत शिवार कार्यक्रम खासदार चिखलीकर यानी केला नायगांव व बिलोली तालुक्याचा दौरा

जिल्हायात सद्या भाजपा च्या वतीने पिक पाहाणी

Sudarshan MH
  • Oct 12 2020 10:33AM

नांदेड दि.१२(अरविंद जाधव) जिल्हायात सद्या भाजपा च्या वतीने पिक पाहाणी व शेत शिवार आभियान राबवुन थेट बाधावरच शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन

घेण्यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नायगांव व बिलोली तालुक्यात आज झझावंत दौरा केला.

या दौऱ्यात खासदार चिखलीकर यानी व्यक्त केलेले विचार

शेतकरी विधेयक म्हणजे शेतकर्या च्या हिताचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय   
           
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.
नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेला शेतकऱ्याच्या हिताचा  कायदा पारित करून शेतकरी वर्गा साठी कृषी संजीवनी निर्माण केली असून विरोधकांनी उठवलेली बोंब म्हणजे

आगपाखड होय.या साठी शेतकरि हिताच्या विधेयकाला विरोध करणाऱयांना न जुमानता खंबीर पणे शेतकरी वर्गाने मोदिजीने घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहावे असे प्रतिपादन खा.प्रतापरावा पाटील चिखलीकर यांनी केले.

मि हि शेतकऱ्यांचा मुलंगा आहे.म्हणून मला शेतीच्या व शेतकऱ्यांच्या आडचणी समजतात

आजकाल कोणीही काहीही भाष्य करत आहेत.त्याबद्दल मि बोलणार नाही.पण शेती व शेतकऱ्यांच्या काय आडचणी आसतात याच जाणिव मला लहाणपणापासुन आहे वडिल शेतात जायचे मि हि त्याच्या सोबत शेतातील पिक.मशागत.लागणारी यात्रकी सामुग्री चा मला चांगला अनुभव आहे.त्यामुळेच मि थेट बांधावर येवुनच शेतकऱ्यांना संवाद साधत आहे.मला समजले कि नायगांव व बिलोली तालुक्यात आतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्या कोरोना महामारिमध्ये उत्पन्न नाही व यात आसे आसमानी संकट व जनावरावर लंपी सारखा संसर्गजन्य रोग म्हणजे शेतकऱ्यांना चौहो बाजुनी संकटाला तोड द्यावे लागत आहे.

स्थानिक नेत्रत्व कमी पडत आसेल तर मि आपल्या सेवेत आहे

आजच्या पिक पाहाणी वशेत शिवार आभियान आसल्यामुळे मि राजकीय भाष्य करणार नाही पण मला सामान्य कार्यकर्ते म्हणून आपण खासदार केलात निश्चितच मि आपल्या समस्या,आडचणी शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करिन.कोणत्याही बँक.कृषीअधिकारी,महसुल विभागातील कर्मचारी.विद्युत कर्मचारी.किवा कोणत्याही खाजगी कंपनी चे आधिकारी याच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधीचा वचप आसला पाहिजे ते मला येथे दिसत नाही.पण मि सदैव आपल्याबरोबर राहाणार आहे मला आपण निस्कोच फोन करा.प्रत्यक्षात भेटा आपले समाधान व काम करण्यासाठी तयार आहे.

मला सर्वच राजकीय पक्षाचा व नेत्यांचा आनुभव आहे

मि राजकीय सुरुवातच चिखली ग्रामंपचायत पासुन केली.आजपर्यंत 15 निवडणूका मि प्रत्यक्ष लढवल्या मला फाक्त 2009 चीच विधानसभा मध्ये पराजित झालो.पण पुढे शांत न राहाता माझा राजकीय संघर्ष चालु ठेवला जनता जनार्धन यानी मला आज देशाच्या सर्वोच्च लोकसभेचा सदस्य म्हणजे खासदार म्हणून निवडून दिली याची जाणिव मला आहे.म्हणून माझे काम हे सामान्यतः लोकांच्या आडचणी सोडवणे हेच प्रमुख आस्र्त माझ्याकडे आहे.

     मौ.होंटाळा ता नायगाव येथील शिवराज पाटील होटाळकर यांच्या शेतात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होते . ते पुढे म्हणाले हे विधेयक मंजूर करण्यात आले तेंव्हा मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मला मंत्रालयात बसता आले नाही हे माझे दुर्भाग्य, विरोधक हे विधेयक चुकीचे आहे असे म्हणून दिशाभूल करीत असून ओठात एक व पोटात एक ठेवणाऱ्या नी शेतकरी हिताच्या निर्णयाला विरोध करणे म्हणजे शे
शेतकऱ्यांना  त्रास देने होय.असे असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याचे काम करण्याचे सामर्थ्य आमच्या मध्ये आहे असेहि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी बोलताना वक्त केले. 
     भाजप सरकारनेशेतकऱ्यांना पेन्शन मिळवून देण्याचा काम केलं आहे.नायगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे वेळेत पंचनामे होत नसतील तर मी त्या ठिकाणी स्वतः येऊन पंचनामे करून घेण्यास भाग पाडेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
      
या वेळी उदघाटनिय भाषणात आ राम पाटील रातोळीकर म्हणाले गरिबी ही देवाच्या हाती नसून शासनाच्या धोरणाच्या हाती असते 60 वर्ष काँग्रेसने शेतकऱयांचे महाभारतातील द्रौपदीचे जसे वस्त्रहरण करावे तसे केले    पण  भाजपा च्या  सरकारने शेतकरि हिताचे तिन्ही विधेयक  आणून नरेंद्र मोदींच्या रुपात श्री कृष्णा सारखे धावून येऊन शेतकऱ्यांचे वस्त्रहरण थांबवून शेतकरी हित जोपासले आहे. हमीभावा चा विषय महत्वाचा असून शेतकर्या नी हिताचा निर्णय ओळखून मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करावे असे विचार रातोळीकर यांनीमांडले या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष वेंकट पाटील गोजेगावकर,यांनी भाजपचे शेतकरी हिताचे कार्य सविस्तर पणे मनोगतातून व्यक्त केले

  दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी शिवराज पाटील होटाळकर यांच्या शेतावर पीक पाहणी व शेत शिवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या पीकपाहणी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राम पाटील रातोळीकर ,प्रमुख मार्गदर्शक व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते.प्रमुख उपस्थीती डाँ अजित गोपछडे ,लक्ष्मण ठकरवाड, श्रावण पाटील भिलवंडे,राजेश कुंटुरकर,माणिकराव लोहगावे,बालाजी बचेवार,,उमरी प स सभापती शिरीष देशमुख गोरठेकर,, 
भा ज प नायगाव तालुका अध्यक्ष कोंडीबा पाटील , पत्रकार सुनील रामदासी,बाबासाहेब हंबर्डे ,गजानन पाटील जुने,सभापती प्रतिनिधी विठल कते, , देविदास बोमनाळे,शिवाजी जाधव, गजानन पाटील तोडे,गाजनन पाटील चव्हाण, भाजपा.नायगाव तालुका माजी अध्यक्ष धनराज शिरोळे ,विजय होपळे, दत्ता पाटील होटाळकर ,सूर्याजी पाटील चाडकर,संजय पाटील इज्जतगावकर,शँकर कल्याण,आदीची उपस्थिती होती
कार्यक्रमात प्रास्ताविक माणिक लोहगावे तर संचलन बापुलें सर व आभार प्रा.डाँ जीवन चव्हाण सर यांनी मांनले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार