सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अन् पोलीसाने कर्तव्यावरच दिली ‘यचममुवि’ची ऑनलाईन परीक्षा .

जगाने तंत्रज्ञान स्वीकारले आहे.या आधुनिक तंत्रज्ञानाच्या

Sudarshan MH
  • Oct 10 2020 10:32AM
जगाने तंत्रज्ञान स्वीकारले आहे.या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येकांने तंत्रज्ञानाची कास धरूणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या अभ्यास केंद्रातील (८४९७ अ) परिक्षार्थी ओंकार व्यंकटराव पाटील या पोलीस बांधवाने कर्तव्यावर असतांनाही ऑनलाईन परीक्षा देऊन आपले कर्तव्य व अध्यापन निष्ठा अधोरेखित केली आहे.

‘ कोरोना-१९’ काळाची संवेदनशील परिस्थती लक्षात घेऊन, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने एम.ए.द्वितीय आणि बी.ए.,बी.काॅम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या असून या परीक्षांना अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांचा शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी दिली.

दि.७ ऑक्टोबर पासून या परीक्षांना प्रारंभ झाला असून, महात्मा फुले महाविद्यालयातील ४६ विद्यार्थी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने देत असल्याचे केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील,केंद्र संयोजक डॉ.अनिल मुंढे,डॉ.सतोष पाटील यांनी सांगितले.या अभ्यास केंद्रांतर्गत पदवी तृतीय वर्षाच्या परीक्षा दि.१३ ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत.‌या परीक्षेस महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील १५५ विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने बसणार आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना केंद्र संयोजक डॉ.अनिल मुंढे व केंद्र सहायक डॉ. संतोष पाटील हे तंत्र सहाय्य करीत आहेत.

आत्तापर्यंत तरी एकाही परीक्षार्थ्याला कोणतीही अडचण आली नाही.जर विद्यार्थ्यांना अचानक तांत्रिक अडचणी निर्माण होत असतील तर त्यांनी अभ्यास केंद्राशी मोबाईल फोनवरून संपर्क साधावा,असे आवाहन प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केले आहे.


परीक्षार्थी यशस्वी रित्या परीक्षा देत आहेत-डॉ.बी.के. मोहन

संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेत आहे.यामध्ये शहरी, ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.ऑनलाईन पद्धतीने सर्व दूर यशस्वी रित्या विद्यार्थी परीक्षा देत आहेत.या परीक्षांच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमातून ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याचे कार्य केले जात आहे.विद्यापीठाचे कुलगुरू मा.ई.वायुनंदन, कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे,परीक्षा नियंत्रक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑनलाईन परीक्षा सुरळीत चालू आहेत. तसेच विभागीय केंद्र नांदेड अंतर्गत येणाऱ्या नांदेड,लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत होण्यासाठी विभागीय केंद्र नांदेड येथील कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.अशी माहीती डॉ.बी.के.मोहन(वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार,विभागीय केंद्र,नांदेड) यांनी दिली आहे.


शहरी ग्रामीण आणि दुर्गम भागातही ऑनलाईन परीक्षा यशस्वी – चंद्रकांत पवार

कोरोना-१९ हा काळ संकट नसून संधी आहे.हेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या दूर शिक्षणांतर्गत परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.नांदेड विभागांतर्गत आजमितीला जवळपास ३० हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत असून त्यांना अद्यापपर्यंत तरी कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या नाहीत.विशेष म्हणजे या परीक्षा शहरी भागा बरोबरच ग्रामीण व दुर्गम भागातही प्रचंड प्रमाणात यशस्वी ठरलेल्या आहेत. ‘कोव्हिड-१९’ परिस्थिती विषयीचे अव्हेरनेस विद्यार्थ्यां मध्ये निर्माण झाले आहे.परीक्षेत विद्यार्थ्यांचे प्रशासनाला जे सहकार्य मिळत आहे ते वाखाणण्याजोगे आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या सध्याच्या या परीक्षा म्हणजे ‘नेक्सट जनरेशन एक्झामिनेशनची’ तयारी आहे.असे मत चंद्रकांत पवार(सहाय्यक कुलसचिव,विभागीय केंद्र,नांदेड) यांनी व्यक्त केले आहे.


तांत्रिक मदतीसाठी व्हाट्स ग्रुपची निर्मिती – प्राचार्य डॉ.वसंत बिरादार

महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या अभ्यास केंद्राला अंतर्गत असलेल्या सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे आतापर्यंतचे सर्व पेपर्स कसल्याही तांत्रिक अडचणी न येता ऑनलाईन पद्धतीने पार पडले आहेत.महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राने नांदेडचे विभागीय वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ.बी.के.मोहन व सहाय्यक कुलसचिव चंदकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षार्थ्यांचा वर्ग निहाय व्हाट्स अप ग्रुप तयार करण्यात आला असून महाविद्यालयात परीक्षा नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहे.याद्वारे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक माध्यमांतील सर्व अडचणी दूर करण्यासाठी केंद्र संयोजक डॉ.अनिल मुंढे,केंद्र सहाय्यक डॉ.संतोष पाटील,केंद्र शिपाई शिवाजी चोपडे हे चोवीस तास कार्यरत आहेत.अशी माहीती डॉ.वसंत बिरादार (प्राचार्य तथा केंद्र प्रमुख, अहमदपूर) यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार