सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: घरातून चालणारे पशुवधगृह बंद करा; हिंदु संघटनांची संयुक्त मागणी

येथील काही मोहल्ल्यामध्ये घराघरातून चालवल्या जाणाऱ्या पशुवधगृहांवर धडक कारवाई करून

Sudarshan MH
  • Oct 8 2020 5:29PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

 

नंदुरबार - येथील काही मोहल्ल्यामध्ये घराघरातून चालवल्या जाणाऱ्या पशुवधगृहांवर धडक कारवाई करून ते कायमचे बंद केले जावे, जिल्ह्यासह राज्यभरात गोवंश हत्या बंदी कायदा काटेकोर अमलात आणला जावा व स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करण्यात यावे; यासह विविध मागण्या करणारे निवेदन समस्त हिंदू संघटनांच्या वतीने आज गुरुवार रोजी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गोमातेला पुजनीय मानणार्‍या आणि गायीला देवता मानणाऱ्या आपल्या भारत देशात गोवंशाचे मांस निर्यात करण्याचे उच्चांक स्थापले जातात; ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. रोज हजारो गायींची,बैलांची व अन्य गोवंशाची उघडपणे कत्तल केली जात आहे. चालू 2020 या वर्षात सुमारे 50 हजार टन हून अधिक गोवंश मास निर्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हजारो कोटी रुपयांचा नफा मिळवून देणारा सोपा व्यवसाय म्हणून गोवंश हत्येकडे पाहिले जात आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागू असतानाही त्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात लॉक डाउन असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात गोमांस निर्यात चालू राहिली. लॉकडाउनच्या सात महिन्याच्या कालावधीत गोमांसच्या अवैध वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही, असे नमूद करून निवेदनात मागण्या करताना म्हटले आहे की, राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा कठोरपणे अमलात आणला जावा, गो हत्या थांबून पशुसंवर्धनाला चालना मिळावी म्हणून इकोफ्रेंडली होळी, इको फ्रेंडली गणपती, इको फ्रेंडली दिवाळीच्या धर्तीवर राज्य सरकारने इको फ्रेंडली ईद साजरी करण्याचे बंधन घालावे, गोमूत्र शेण आदी पंचगव्यांना व्यवसायिक प्रोत्साहन द्यावे, स्वतंत्र  गोमंत्रालय स्थापन करावे, गो रक्षकांना संरक्षण पुरवण्यात यावे तसेच नंदुरबार शहराच्या अनेक भागात मोहल्ल्यात घराघरातून चालू असलेले अवैध पशुवधगृह बंद करण्यात यावे त्यांची यादी बनवून तातडीनेे त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या या निवेदनाद्वारे गोरक्षक डॉ नरेंद्र पाटील, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिलीप ढाकणे पाटील, क्षत्रिय राणा राजपूत सेवा समितीचे चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, स्वदेशी बचाव आंदोलनाचे कपिल चौधरी, हिंदुत्वनिष्ठ मयुर चौधरी यांनी केल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार