सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षण प्रश्नी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने खा.चिखलीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन

संभाजी ब्रिगेडच्या वतीने खा.चिखलीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन

Sudarshan MH
  • Oct 7 2020 6:25PM
नांदेड दि. 7 -
मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी तसेच नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात आले. सत्तेतील आणि विरोधी पक्षातील झोपलेल्या लोकप्रतिनिधींना संवैधानिक मार्गाने जागे करण्यासाठी हे जागर आंदोलन करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जवाबदार आहेत. केंद्र सरकारनेसुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्याकारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी आरक्षण प्रश्नी लोकसभेत प्रश्न मांडून तो लवकरात लवकर सोडवावा, असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर निवेदनात म्हणटले आहे. येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या मागणीचे निवेदन जागर आंदोलन करून खा.चिखलीकर यांना देण्यात आले.
यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वाभिमानीच्या सर्व मागण्या ऐकून येणाऱ्या काळात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक आंदोलनात तसेच मराठा आरक्षण प्रश्नाला भाजपाचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, डॉ.बालाजी पेनूरकर, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मंगेश पाटील कदम
जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम व दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगनुरे यांनी मनोगत व्यक्त करून सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाला पाटील कदम, हनमंत पाटील वाडेकर, विदर्भ संपर्कप्रमुख शिवाजी जाधव, नांदेड संपर्कप्रमुख बालाजी कऱ्हाळे, वि.आ. संपर्कप्रमुख वैभव भिसीकर, कार्यकारी सदस्य मंगेश पाटील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटील कदम, महानगराध्यक्ष किरण पाटील गव्हाणे, ता.संपर्कप्रमुख दत्ता माळेगावे, जिल्हा सचिव संभाजी पाटील जाधव, जिल्हा उपाध्यक्ष माधव वडवळे, माधव डाकोरे, तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, अभिजीत वरळे, आत्माराम पाटील जोगदंड, ता.उपाध्यक्ष बजरंग जिगळेकर, चंदू तळेकर, गंगाराम पाटील कदम, योगेश पाटील शिंदे, शिवा पाटील तळेकर, ऋषी पाटील वानखेडे, उमेश घोरबांड, निरंजन कदम, योगेश घोरबांड व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार