सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेडच्या सायकलपटू व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

तरोडानाका ते लिंबगाव रस्ता सकाळी अवजड वाहनासाठी बंद

Sudarshan MH
  • Oct 7 2020 6:19PM
नांदेड:दि.7(अरविंद जाधव).नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी हा मार्ग सायकलपटू व पायी फिरणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. या विनंतीचा व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हे निर्देश दिले.  

 या निर्देशाप्रमाणे तरोडानाका ते लिंबगाव पर्यंत सकाळी 6 ते 9 या कालावधीत यापुढे जर अवजड वाहने आल्यास मोटार ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

जनहित लक्षात घेऊन व जिल्ह्यातील युवा क्रीडापटू, खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल क्रीडापटूंनी समाधान व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार