सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेडमध्ये हाथरस येथील घटनेचा निषेध उत्तरप्रदेश सरकारच्या पुतळ्याचे दहन

उत्तरप्रदेश सरकारच्या पुतळ्याचे दहन

Sudarshan MH
  • Oct 2 2020 5:38PM
नांदेड दि.2(अरविंद जाधव)उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांकडून मध्यरात्री पीडीतेच्या मृत्यदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पीडीतेच्या कुंटुबियाला भेटून सात्वंन करण्यासाठी जाणार्‍या काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करणार्‍या सरकारचा निषेध करत काँग्रेस रस्त्यावर उतरली असून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. उपचार सुरु असतांना सदर पीडीत युवतीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडीतेच्या कुटुंबीयाची भेट घेण्यासाठी जात असतांना पोलिसांनी रस्त्यात दोन्ही नेत्यांना अडवून धक्काबुक्की केली तसेच त्यांना अटक केली या घटनेचा काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र निषेध केला आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहराच्या आय.टी.आय येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविला आहे.
यावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहन हंबर्डे, जि.प.अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुदखांन, ज्योत्सना गोडबोले, जि.प.चे सभापती संजय बेळगे, विजय येवनकर, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे, विरेंद्रसिंघ गाडीवाले, किशोर भवरे, फारुख अली खान, उमेश पवळे, सुभाष रायभोळे, अनीता इंगोले, मंगला धुळेकर, राजु यन्नम, महेंद्र पिंपळे, मुन्तेजीत, संजय मोरे, शेर अली खान, भानुसिंह रावत, वाजीद जहांगीरदार, अलीम खान, रहीम अहेमद खान, अब्दुल गफ्फार, महमद नासेर, नागनाथ गड्डम, शमीम अब्दुल्ला, फईम, शंकर शिंंदे, अतुल वाघ, दिनेश मोरताळे, सुषमा थोरात, जुबेर अहेमद, दुष्यंत सोनाळे, संदीप सोनकांबळे, चांदपाशा कुरेशी, रशीद खान पठाण, सदाशीव पुरी, राजु काळे, अमीत वाघ, विजय सोंडारे, संतोष कुलकर्णी, रुपेश यादवसह काँगे्रस पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिग नियमाचे पालन करत आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी ना. अशोक चव्हाण म्हणाले की, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील युवतीवर झालेला अत्याचार व त्यानंतर पीडीतेवर पोलिंसांकडून करण्यात आलेला परस्पर अत्यंसंस्कार मानवतेला काळीमा फासणारा आहे. पीडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार्‍या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना आडवून पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र शब्दात निषेध करत लोकशाहीची हत्या करणार्‍या सरकारच्या विरोधात काँग्रेस यापुढेही संघर्ष करणार असुन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आंदोलन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. “राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है”. असा नाराही त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी आ. अमरनाथ राजुरकर यांनीही मोदी व योगी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात टीका केली आहे. यावेळी देशातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात घोषणा देत योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार