सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यातील विद्यापीठ परीक्षेच्या तोंडावर अशासकीय कर्मचारी संघटनांचा होत असलेला संप दुर्दैवी, राज्य सरकारने त्वरित तोडगा काढावा – अभाविप

रास्त मागण्यांसाठी ABVP कर्मचारी संघटनेसोबत,

Sudarshan MH
  • Sep 29 2020 5:32PM

दि. २९ सप्टेंबर २०२०

रास्त मागण्यांसाठी ABVP कर्मचारी संघटनेसोबत, परंतु अंतिम वर्षांच्या परीक्षेंवर कोणताही परिणाम न होवू देण्याचे सर्व कर्मचारी वर्गाला अभाविपचे आवाहन.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालयीन-विद्यापीठांच्या परीक्षेंचे सत्र सुरु असून त्याला एक महत्व आहे. ऐन परीक्षा कालखंडात आलेला कोरोना व त्यानंतरचे लॉकडाऊन यामुळे परीक्षा होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु विद्यार्थ्यांचे भवितव्य बघता अंतिम वर्षांच्या परीक्षा होणे आवश्यक आहेत त्यामुळे या सर्व परीक्षा सध्या राज्यभरात होत आहेत. 
अंतिम वर्षांच्या सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जवाबदारी स्थानिक विद्यापीठ प्रशासनाची आहे. परंतु आपल्या विविध मागण्याना घेवून महाविद्यालय-विद्यापीठ अशासकीय कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कर्मचारी वर्गाचे आंदोलनाला सर्वस्वी सरकारची प्रशासकीय अनास्था जवाबदार आहे असे अभाविपचे स्पष्ट मत आहे. विद्यापीठ प्रशासन सुरळीत चालण्यासाठी या सर्व कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान असते, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा साहजिकच परिणाम परीक्षेवर होणार आहे. आधीच उशिरा होत असणाऱ्या परीक्षा व त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार्य आंदोलन यामुळे राज्यातील परीक्षा, प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम होवून विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. 

“परीक्षेवरील ताण व शैक्षणिक हित लक्षात घेता राज्यात सुरू असलेल्या अशासकीय कर्मचारी संघटनांच्या विविध रास्त मागण्यांबाबत सरकारने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी आज आभाविपने पत्राद्वारे सरकारकडे केली", असल्याची माहिती अभाविप राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी यावेळी दिली. याबाबत मंत्री व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'तसेच रास्त मागण्यांसाठी ABVP कर्मचारी संघटनेसोबत असून, परंतु आंदोलनाचा कोणताही परिणाम अंतिम वर्षांच्या परीक्षेंवर न होवू देण्याचे आवाहन यावेळी कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी कर्मचारी वर्गाला केले आहे.'  

( हे प्रसिद्धी पत्रक मुंबई कार्यालय येथून प्रकाशित करण्यात येत आहे 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार