सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई विद्यापीठाच्या विरोधात अभाविप चे जागरण गोंधळ आंदोलन.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क

Sudarshan MH
  • Sep 25 2020 12:23PM
दि.२५ सप्टेंबर २०२०
वेळ : दुपारी १२.१५ वाजता

मुंबई विद्यापीठाच्या विरोधात अभाविप चे  जागरण गोंधळ आंदोलन.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अनेक समस्यां निर्माण होत होत्या. या विषयात अनेकवेळा विद्यापीठ प्रशासनासोबत बैठका झाल्या या बैठकीत, अभाविपने केलेल्या मागणीनुसार विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क ४ टप्प्यांमध्ये भरण्याबाबत चे पत्रक २३ सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध करेल, असे आश्वासन विद्यापीठाने प्रशासनाने दिले होते.
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येतील व विद्यार्थ्यांचे रखडलेले निकालही दोन दिवसात जाहीर करू. या विषयांवर त्वरित निर्णय विद्यापीठ करेल असे आश्वासन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.रविंद्र कुलकर्णी सर यांनी दिले होते.
“वारंवार चर्चा करून सुद्धा विद्यापीठ प्रशासन फक्त आश्वासन देत आहे. येत्या दोन दिवसात वरील विषयांवर निर्णय झाले नाहीत तर अभाविप विद्यापीठाविरोधात येत्या २५ सप्टेंबर ला तीव्र आंदोलन करेल.” असा ईशारा कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी दिला होता. अजून पर्यंत विद्यापीठ प्रशासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने झोपलेल्याला जागं करता येतं, परंतु झोपेच सोंग घेतलेल्या मुंबई विद्यापीठाला जागं करण्यासाठी, विद्यापीठा विरोधात अभाविप ने जागरण गोंधळ आंदोलन केले. त्याच बरोबर विद्यापीठात चाललेल्या गोंधळाची माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज  दाखल करू.
( सदर प्रसिद्धीपत्रक कोंकण प्रदेश कार्यालय श्री मंत्री प्रणय वंडेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे )

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार