सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खंडणी मागणा- या महिलेसह एक जण पोलिसांच्या ताब्यात.

माहिती अधिकारात माहिती मिळवून

Sudarshan MH
  • Sep 25 2020 10:48AM
नांदेड दि.२५(अरविंद जाधव): माहिती अधिकारात माहिती मिळवून एका कंत्राटी महिलेस खंडणी मागणाऱ्या उषा नरवाडे व एका व्यक्तीस वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे.यापूर्वी माहूर येथील तहसिलदारास खडणी मागणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती,यास घटनेच्या काही दिवसानंतर खंडणी प्रकरणात उषा नरवाडे व एका व्यक्तीस अटक होण्याची दुसरी घटना आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागात कंत्राटी पदावर कार्यरत असलेली महिला सुरेखा हरिषचन्द्र सुरेकर कार्यरत आहेत. आवक जावक रजिस्टरमध्ये काही नंबर सोडले होते.या प्रकणात शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार उषा नरवाडे यांनी केली. हे प्रकरण माघार घेण्यासाठी सुरेखा सुरेकर यांच्याकडून चार पगार देण्यात यावेत,अन्यथा 40 हजार रुपये देण्याची मागणी उषा नरवाडे यांनी केली,शेवटी तीस हजार रूपये देण्यात यावेत,अशी मागणी रेटून धरली,या प्रकरणात माझी चूक नसताना मागणी केली जात असल्याची तक्रार सुरेखा सुरेकर यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात दिली.
यावरून वजीराबाद पोलिसांनी सापळा लावून उषा नरवाडे व मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष सुनेवाड या दोघांना आनंद नगर भागातून अटक केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार