सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

करा प्लाझ्मा दान, वाचवा कोविड रुग्णांचे प्राण जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन

जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन

Sudarshan MH
  • Sep 24 2020 11:35AM
करा प्लाझ्मा दान, वाचवा कोविड रुग्णांचे प्राण जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन 

पालघर - ( मनीष गुप्ता ) प्लाझ्मा  दान करणे ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे, जी १०० वर्षाहुन अधिक वर्ष रुग्णांचे जीव वाचविण्यात मदत करण्यासाठी वापरली जात आहे.प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोविड १९ चा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी कोविड १९ बाधित रुग्ण जे पूर्णतः बरे झाले आहेत त्या जास्तित जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येवून कोविड १९ च्या रुग्णांना जिवनदान देऊन कोरोना रुग्णाला वाचवण्याचे मोठे काम करावे असे आवाहन  पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, वसई विरार महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला केले आहे.


कोरोना रोगापासून पुर्णपणे बरा झालेल्या कोरोना योध्दयांनी कोरोना झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याची
तातडीची गरज आहे कारण आपली रोगप्रतिकारक प्रणाली कोरोना विरुध्द लढली, त्यामुळे आपल्यामध्ये
अँटीबॉडीज आहेत जे इतरांनाही लढायला मदत करतील असे मत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले आहे.

कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा हा रक्तांचा एक द्रव भाग आहे, जो कोविड १९ रोगापासून पूर्णपणे मुक्त झालेल्यारुग्णांकडून गोळा केला जातो. कोविड १९ रुग्णांमध्ये विषाणूविरुध्द रक्तामध्ये रोगप्रतिकारक (अॅन्टीबॉडीज) तयार होतात. अॅन्टीबॉडी असे प्रोटीन आहेत जे संक्रमणास विरोध करण्यासाठी मदत करतात

कोरोनाची लागण होऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या १८ ते ६० वयोगटातील ५५ कीलोग्रॅमच्या वर वजन असलेल्या आणि इतर रक्तदान निकषांची पूर्तता केली असावी असा पुरुष प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरतो. प्लाझ्मा डोनेशन दरम्यान एक हातातुन रक्त काढले जाते आणि एक हायटेक मशिनकडे जाते ते मशिन आपला प्लाझ्मा संकलित करते आणि नंतर सुरक्षित लालपेशी आणि काही प्रमाणात सलाईन आपल्या शरीराकडे परत येते.या प्रक्रियेमुळे नियमित रक्तदानापेक्षा जास्त वेळ प्लाझ्मा दान घेते (६० ते ९० मिनिटे) पात्र प्लाझ्मा दाता प्रत्येक १४ दिवसांनी कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा देवू शकतो.

अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभामार्फत देण्यात आली आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी विजय महाजन चेअरमन साथीया ट्रस्ट ब्लड बँक दूसरा मजला, तानीया
प्लाझा बिल्डींग, स्नेहांजली शोरुमच्या मागे, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पश्चिम) फोन नंबर ९०२८६४१८८६ यांचेशी सम्पर्क साधावा,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार