सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिकांचा नुकसानीचां पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा.

पिक विमा कंपनीने सरसगट पिक विमा द्यावा.

Sudarshan MH
  • Sep 24 2020 11:25AM
हदगाव दि.24(अरविंद जाधव)

 हदगाव तालुक्यात सोयाबीन कापूस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मागच्या काही दिवसांपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्यातून कोंब फुटत आहे.जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. पावसाने उघाड दिल्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगाच लागल्या नाहीत. आॅगस्ट च्या शेवटी आलेल्या रिमझिम पावसामुळे रोग पडला. या सगळ्यातून जे वाचलं तेही सध्या सुरू असलेल्या पावसात हातचं गेलं आहे या सर्व नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठीचा  अहवाल सरकारकडे जिल्हा प्रशासनाने सादर करावा, व पिक विमा कंपनीने सरसकट नुकसान ग्राह्य धरत शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

उडीद आणि मूग नंतर आता सोयाबीन,कापूस,ज्वारी हातचं गेलं असल्याने शेतकरी बांधवांची या वर्षीच्या उत्पन्नाची आशा मावळली असल्याने ग्रामीण भागात मोठं नैराश्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. आज याबाबत तहसीलदार जीवराज डापकर यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन पीक विमा मिळवून देण्यासाठी पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याची व नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी केली.
 पावसामुळे शेतातील कापूस, सोयाबीन, बाजरी, ऊस आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस पक्वतेकडे आला असताना शेतात गुडघाभर पाणी साचल्याने बोंडे नासुन चालली आहेत तर सोयाबीन,ज्वारी ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जमीनदोस्त होत आहे. सोयाबीन शेंगा,ज्वारीच्या कणसांमधील बियांना कोमारे फुटून शेतकऱ्यांची मेहनत वाया जात असल्याचे बघवत नाही. प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यायला हवी व पीकविमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू करायला हवी. शेतकऱ्यांना अस्मानी अन सुलतानी दोन्ही संकटाचा सामना करावा लागत आहे, तत्पूर्वी  नुकसानीचा पाहणी लिंगापूर येथे उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर तालुका कृषी अधिकारी आर,डी रणवीर यांच्यासमवेत भागवत देवसरकर यांनी केली होती.

यावेळी सोबत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप वानखेडे तालुका अध्यक्ष विलासराव माने शेख रहीम अविनाश पाटील वायपणकर श्रीराम माने भगवान देवसरकर भास्कर देवसरकर अनिल देवसरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार