सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोविंड सेन्टर मध्ये महिलांवर होनार्या अत्याचार ,असुविधा तसेच असुरक्षितेच्या विरोधात भाजपा वसई विरार जिल्हा तर्फे आंदोलन

असुविधा तसेच असुरक्षितेच्या विरोधात भाजपा वसई विरार जिल्हा तर्फे आंदोलन

Sudarshan MH
  • Sep 22 2020 4:43PM
वसई - ( मनीष गुप्ता ) महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अति गंभीर होत चालला आहे. त्यातच कोरोना सारख्या अति संवेदनशील काळात ही कोविंड सेन्टर व हाँस्पिटल मध्ये  महिलांवर अत्याचार आणि विनयभंग सत्र सुरू च आहे. आपल्या वसई विरार जिल्हातिल कोविंड सेन्टर मध्ये ही महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन उदासीनच आहे.महाराष्ट्र प्रदेशात घडत असलेल्या घटना पाहता भाजपा वसई विरार जिल्हाने ह्याचे गांभीर्य ओळखुन शनिवार दि ८ आँगस्ट२०२० रोजी भाजपा महा. प्रदेश उपाध्यक्षा मा.सौ.चित्राताई वाघ ह्यांच्या वसई दौऱ्यादरम्यान  भाजपा व.वि जिल्हा अध्यक्ष मा.श्री.राजनजी नाईक यांच्या उपस्थित भाजपा व.वि.श.महिला मोर्चा जिल्हाअध्यक्षा सौ. प्रज्ञाताई पाटील व प्रमुख पदाधिकारी ह्यांनी वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रातातील कोविंड सेन्टर व हाँस्पिटलाला भेट दिली आणि आढळून आलेल्या गंभीर त्रुटींचा सुधारणे करीता पाठ पुरावा केला गेला. वसई विरार महापालिका आयुक्तांना सदर घटना व त्रुटी बद्दल दिनांक-१० ऑगस्ट २०२० रोजी निवेदन हि दिले परंतु सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेवून त्याला साधा प्रतिसाद ही पालिका आयुक्तांनी देण्याची शिष्ठाई दाखवली नाही.
या वरुन हे सरकार व पालिका प्रशासन महिला सुरक्षेबाबत किती असंवेदनशील आहे व निष्क्रिय आहे हेच साध्य होते.  

क्वारंटाईन केंद्रात करावयाची उपाययोजना    :---                      १. क्वारंटाईन सेन्टर मध्ये महिला व.पुरुष रुग्णांना स्वतंत्र ठेवण्याची वाँड व्यवस्था असावी.
२. प्रत्येक मजल्यावर सी.सी.टीव्ही लावण्यात यावे.वते रेकॉर्ड रोजच पहावे.
३. महिला वाँड मध्ये  महिला सुरक्षा रक्षक , महिला सफाई कर्मचारी असावेत.
४. महिला रुग्णांना करिता  अत्यावश्यक बेल असावी,  ५.सेन्टर मध्ये रुग्णांचा सर्विस्तर तक्ता असावा.
६. क्वारंटाईन सेन्टर मध्ये प्रत्येक गोष्टींची नोंद असावी.
७. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही सेन्टर आहेत तेथे पी.पी.ई किट सहीत महिला पोलीस कर्मचारी असावेत.
८. अशा घटना घडु नयेत म्हणून sop तयार करून तात्काळ अंमलबजावणी करावी. 
वरील प्रमाणे सर्व वस्तूस्तिथी असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश दि.२२सप्टेबंर २०२०रोजी सर्व महाराष्ट्रातील महापालिका व पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहेत आम्ही ही भाजपा व.वि.श.जिल्हा व मंडळ महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यां तर्फे वसई विरार महापालिका आयुक्त आणि पोलिस ठाण्यात आज निवेदन दिले.ह्या नंतरही काही उपाययोजना नाही झाल्या. तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविंड सेन्टर व हाँस्पिटल मध्ये झालेल्या अत्याचार बाबत तसेच वसई विरार महापालिकेला ईतर शहरा प्रमाणे येथेही बलात्कार, विनयभंग च झाल्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे का? असा जाब विचारायला झोपलेल्या पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी उग्र आंदोलन केले जाईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार