सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भरमसाठ वीज बिले रद्द करून वीज ग्राहकांना दिलासा न दिल्यास भाजपा कडुन उग्र आंदोलनाचा इशारा

वीज ग्राहकांना दिलासा न दिल्यास भाजपा कडुन उग्र आंदोलनाचा इशारा

Sudarshan MH
  • Sep 22 2020 4:39PM
वसई - ( मनीष गुप्ता ) महावितरण चा अनागोंदी कारभार सुधारणे, लाॅकडाऊन काळात आकारलेली भरमसाठ वीज बिले रद्द करणे, ३०० युनिट पर्यंत वीज बिले माफ करा व अन्य जनहिताच्या मागण्या ३०/०७/२०२० व ११/०८/२०२० रोजी निवेदनाद्वारे मांडल्या, तसेच २६/०८/२०२० रोजी भाजपा शिष्टमंडळाने अधिक्षक अभियंता यांची भेट घेऊन जनतेला दिलासा देण्याबाबत आग्रह धरला. परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव ४ सप्टेंबर २०२० रोजी महावितरण विरोधात शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले. अधीक्षक अभियंता श्री.राजेशसिंग चव्हाण यांची भेट घेण्यापासून पोलिसांनी आंदोलकांना रोखताच भर उन्हात आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केले, काही कालावधी नंतर अधीक्षक अभियंता यांनी आंदोलकांची भेट घेऊन पुढील ९ दिवसात भरमसाठ वीज बिले व वीजेसंबंधी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचा मान राखून आंदोलन स्थगित करण्यात आले. 
परंतु आजतागायत महावितरण अधिकाऱ्यांकडून कुठलाच सकारात्मक प्रतिसाद अथवा मागण्यांबाबत संवाद साधण्याची कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांमधे असंतोष खदखदत आहे. 
महावितरण ने दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत नागरिकांच्या वतीने भाजपा ने केलेल्या मागण्यांबाबत  भूमिका लेखी स्वरूपात स्पष्ट करावी अन वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अन्यथा पुनश्च नाईलाजास्तव महावितरणाच्या निगरगट्ट वर्तणुक अन गलथान कारभाराविरोधात उग्र आंदोलन पुकारण्यात येईल, त्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल.
आज दिनांक २२/०९/२०२० रोजी महावितरण वसई पुर्व कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अभय कक्कड , जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट, वरिष्ठ पदाधिकारी अशोक यादव, शरद सुर्वे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पवन सिंग उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार