सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाड इमारत दुर्घटनेतील मदतकार्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचा सन्मान - पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते टीडीआरएफ व अग्निशमनदलातील जवानांचे कौतुक.

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते टीडीआरएफ व अग्निशमनदलातील जवानांचे कौतुक.

Sudarshan MH
  • Sep 19 2020 7:45PM
ठाणे :- महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रसंगी ठाणे महानगरपालिकेची अग्नीशमन दलाची व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF)प्रत्येकी एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल होवून तेथील मदतकार्य वेगाने सुरू केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल व आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

२४ ऑगस्ट रोजी महाड येथील काजळपूर येथे इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये  इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेच्या  अग्नीशमन दलाची व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) ची  पथके घटनास्थळी रवाना होवून मदतकार्यास सुरूवात केली. एनडीआरएफच्या टीमसोबत टीडीआरएफ व ठाणे महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या सहकार्याने मदतकार्य वेगाने सुरू करुन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. त्यांच्या या योगदानाबद्दल ठाणे महापालिकेस प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. हा सत्कार ठाणे अग्निशमन विभागातील उपस्थानक अधिकारी ओंकार वैती व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवान  सचिन दुबे यांनी स्विकारला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार