सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेडच्या पोलीस अधीक्षक पदी उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची नियुक्ती

राज्यातील ४२ आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

Sudarshan MH
  • Sep 18 2020 12:56PM
नांदेड दि.१८ (अरविंद जाधव):  राज्यात एकूण ४२ आयपीएस व म पो से अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यापैकी २२ अधिकाऱ्यांना पोस्टिंगची ठिकाणं देण्यात आली असून उर्वरीत अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचं शासन आदेशात नमूद केलं आहे.

अमिताभ गुप्ता यांच्या जागी विनीत अग्रवाल मंत्रालयात येणार आहेत. अग्रवाल हे अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे कार्यरत होते. त्यांना गृह खात्याच्या प्रधान सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्याबरोबरच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव दलातील समादेशक सचिन पाटील यांची नियुक्ती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेशन यांची बदली विशेष अभियानाच्या अपर पोलीस महासंचालक पदी करण्यात आली आहे.

गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांची रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे आता अहमदनगरचे पोलीस अधीक्षक असतील. रत्नागिरी ते पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची जळगावच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात हेवीवेट जिल्हा म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पदी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम हे आता सांगलीचे पोलीस अधीक्षक असतील. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नियुक्ती कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. विनायक देशमुख यांचा जालना चे पोलीस अधीक्षक असतील राजार रामास्वामी हे बीडचे पोलीस अधीक्षक असते नांदेडच्या पोलीस अधीक्षक पदी उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूरच्या पोलीस अधीक्षक पदी निखिल पिंगळे, वर्ध्याच्या पोलीस अधीक्षक पदी प्रशांत होळकर तर मुंबईचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील अमलीपदार्थ विरोधी पक्षाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांची नियुक्ती दहशतवाद विरोधी पथक पोलीस उपमहानिरीक्षक पदी करण्यात आली आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन मुंबई येथे करण्यात आली आहे तर मकरंद रानडे यांची बदली राज्य गुन्हे अभिलेख केंद्र येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बदल्यांच्या निर्णयावर विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून सातत्याने टीका केली जात आहे. पोलीस दलातील किंवा महसूल विभागातील, पालिका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या देखील मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीकडून बदल्यांचं राजकारण केलं जात असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार