सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फोन पे च्या कष्टमर केअर ला फोन केल्यावर तथाकथित कॉल सेंटरच्या लोकांनी१३ हजार रुपायांनी युवकाला गंडवले..

वडिलांना फोन पे वर पैसे पाठवल्यावर बराच वेळ त्याची रिपोर्ट पेंडिंग

Sudarshan MH
  • Sep 17 2020 7:03PM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : वडिलांना फोन पे वर पैसे पाठवल्यावर बराच वेळ त्याची रिपोर्ट पेंडिंग दाखवत असल्या कारणाने गुगल वर फोन पे च्या कष्टमर केअर चा नंबर शोधून फोन केले असता समोरच्या व्यक्तीने सर्व एकूण फोन कट केले आणि दुसऱ्या नंबरवरून ग्राहकाला फोन करून चक्क १३ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना चिखली शहरात आज घडली.

सविस्तर असे की, ग्रामीण भागातील एक तरुण आपल्या मामा सोबत त्यांच्या व्यवसायात मदत म्हणून काम करण्यासाठी चिखली येथे येत असे. तरुणाला घरून वडिलांचा पैश्यासाठी फोन आले असता त्याने फोन पे वरून दोन हजार रुपये वडिलांच्या फोन पे अकाउंट वर ट्रान्सफर केले. परंतु बराच वेळ उलटल्यावर सुद्धा वडिलांच्या अकाउंटला पैसे पोहचले नसल्याने फोन पे अकाउंट चेक केले असता पेंडिंग रिपोर्ट दाखवत होते. यावरून फोन पे च्या कष्टमर केअर ला फोन करून झालेल्या त्रासबद्दल विचारायचे तरुणाने ठरवले व गुगल वर फोन पे च्या कष्टमर केअर चा नंबर शोधला आणि फोन करून झालेला सर्व त्रास त्या प्रतिनिधीला सांगितले. सर्व बोलणे झाल्यावर समोरील व्यक्तीने दुसऱ्या फोन वरून फोन करतो असे सांगून फोन कट केले आणि दुसऱ्या नंबर वरून फोन सुद्धा केले. या नंतर तरुणाला मोबाईलवर एनी डेस्क नावाचा मोबाईल एप डाउनलोड करण्यास सांगितले आणि जसे जसे म्हणतो तसे प्रोसेस करण्याचे सांगितले. या नंतर तुमच्या फोन पे अकाउंट ला एरर दाखवत असल्या कारणाने तुमच्या एटीम चे दोन्ही साईडचे फोटो पाठवा, या नंतर एक एक करून पहिले ९ हजार ९९९ रुपये आणि नंतर तीन हजार रुपये असे एकूण १२ हजार ९९९ रुपये फोन पे अकाउंट मधून कटले.
या नंतर तरुणाला जेव्हा कळले की, आपली आज मोठी फसगत झाली आहे, यावरून त्याने बुलढाणा सायबरला या बद्दल कळविले. सध्याही त्या तरुणाला तथाकथित कष्टमर केअर वरून फोन येणे सुरूच असून कोणीही असल्या भानगडीत पडू नये असे संबंधित तरुणाने सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार