सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा जिल्हयातील सर्व जनतेने लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ

मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या

Sudarshan MH
  • Sep 17 2020 11:51AM
पालघर - ( मनीष गुप्ता ) मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची राज्यात सुरवात  झाली असून पालघर जिल्ह्यात सम्पूर्ण जिल्हाभर महानगरपालिका ,नगरपरिषदा, नगरपंचायत, ग्राम पंचायत स्तरावर ही योजना राबवण्यात येत आहे  व त्यास जनतेने भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे   जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी सांगितले. 

 कोविड -१ ९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे . असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे . अशा बदलांचा स्विकार करून , त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयात ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' मोहीमेचा मोठा वाटा असेल असे जिल्हाधिकारी यांनी संगीतले आहे.

 जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे , आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे , कोविड १ ९ चे संशयित रुग्ण शोधणे , उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे आदी बाबी या मोहिमेत राबविल्या जाणार आहेत . 

' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' ही मोहीम वैयक्तिक , कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे . नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे , मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निजंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबतचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिले जाणार आहे . 

वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर , सोसायटी - वसाहतींमध्ये घ्यावयाची काळजी , दुकाने - मंडी - मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना , कार्यस्थळी- कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी - सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी या बाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमेव्दारे देण्यात येणार आहे .
  ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीम जिल्हयातील सर्व नगरपालिका , नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाईल . या मोहिमेंतर्गत सर्व शहरे , गावे , वाडी , ताडे , पाडे इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल  अशी महिती जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार