पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदवसानिमित्त भाजपा महानगराच्या वतीने सेवा सप्ताहाचा शुभारंभ
आपल्या अतुलनीय कार्याने जगभरात वेगळी छबी
नांदेड (अरविंद जाधव) आपल्या अतुलनीय कार्याने जगभरात वेगळी छबी निर्माण करणारे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड भाजपा महानगरच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते रयत रुग्णालयात रुग्णांना ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे जेवणाचे डबे व फळे वाटून करण्यात आला.
रयत रुग्णालयात झालेल्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन सरचिटणीस विजय गंभीरे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली.
प्रवीण साले यांनी आपल्या भाषणात नांदेड महानगरच्या वतीने सेवा सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. नांदेड महानगरच्या वतीने देखील 70 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड महानगर मध्ये सेवा सप्ताह अभियान प्रमुख म्हणून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांची निवड करण्यात आली असल्याचे साले यांनी सांगितले. विजय गंभीरे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात भाजपाच्या सर्व सदस्यांनी सेवा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी यांनी तर आभार जिल्हा चिटणीस मनोज जाधव यांनी मानले. याप्रसंगी
जिल्हा सरचिटणीस व्यंकट मोकले, जिल्हा उपाध्यक्ष शितल भालके, जिल्हा चिटणीस शततारका पांढरे, कार्यालय चिटणीस कुणाल गजभारे, प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक राज यादव, युवा मोर्चाचे श्रीराज चक्रवार, रुपेश व्यास, मंडळ उपाध्यक्ष राजेशसिंह ठाकूर, मंडळ उपाध्यक्ष वेदांत भुतडा, मंडल चिटणीस राहुल बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रयत रुग्णालयाच्या वतीने नरेंद्र पटवारी ,सुनीता ठाकूर हे उपस्थित होते. नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मध्यवर्ती बसस्थानक येथे भव्य भव्य स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आले असल्याचे प्रवीण साले, दिलीप ठाकूर यांनी कळविले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प