सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घातक केमिकलने शेतकऱ्यांचे उभे पिक जळून खाक, पर्यावरासह जलस्त्रोत व जनजीवन ही धोक्यात, प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत

कासा पोलिसांनी केमिकल व km ऑयल माफियांशी हात मिळवणी करत लाखो रूपयांचा गैरव्यवहार करत घातक टाकाऊ रसायनाला ऑयल मधे बदलण्याचा केला प्रताप ? अनेक नागरिकांचा आरोप"

Sudarshan MH
  • Sep 13 2020 5:28PM
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासारी तालुका व कासा पोलिस स्टेशनच्या हद्दितील मौजे मोडगांव, उध्दवा कासपाडा येथिल 10 ते 12 शेतकऱ्यांच्या जवळपास 8 ते 10 एकर शेतातील भात पिक जळून खाक झाले आहे.

दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जवळपास 25 टन  रसायन गुजरातकडे जाणारा टॅकर क्रं. MH 43 U 9643 हा महामार्गाने न जाता, महाराष्ट्र राज्याच्या गुजरात सिमे जवळ असलेल्या दापचरी अच्छाड येथिल चेकपोस्ट वरून न जाता या चेकपोस्टच्या काही किलो मीटर अगोदर असलेल्या धुंदलवाडी-मोडगांव-उध्दवा या गाव भागातील रस्त्यावरून भरधाव वेगात जात असताना पल्टी झाल्याने यातील घातक व विषारी रसायन रस्त्यालगत असलेल्या ओहळीत व भात शेतीत गेल्याने गरिब आदिवासी शेतकऱ्यांचे उभे पिक जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

या प्रकरणी कासा पोलिसांनी केमिकल व ऑयल माफियाशी हात मिळवणी करत प्रकरण दाबले असून टॅकर मालकाला फायदा होईल आशा प्रकारे सोयिस्कररित्या रस्त्यातील खड्ड्यांमुळे मोटार अपघात झाल्याची नोंद तब्बल तीन दिवसानंतर केल्याचे समजते. या मोटार अपघाताची नोंद बाधित शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर कागद रंगविन्यासाठी केल्याचे बोलले जात आहे.

सध्या कासा पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी असलेल्या सहायक पोलिस निरिक्षक सिद्दवा जायभये ह्या पालघर जिल्हा पोलिस दलात आल्यापासून मनोर पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आणि आता कासा सर्वत्रच माफियांशी हित संबंध असल्याच्या चर्चा सर्वत्रच रंगल्या आहेत.

ओव्हर लोड, अवैध मालाची वाहतूक, यामुळे चेकपोस्टवर होणारा त्रास व दंड, शासनाचा कर  बुडविण्यासाठी अनेक ट्रक व टँकर या मधल्या मार्गाचा वापर करतात, याची पूर्ण कल्पना असताना ही धुंदलवाडी व उध्दवा येथिल पोलिस चौक्यांवरुन मासिक हप्ते  बांधून घेतले असल्याने आशा अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या राजरोसपणे ये जा करत असतात.

या प्रकरणी सर्वत्र तक्रारी दाखल झाल्या आहेत. आता प्रशासन 
काय कारवाई करणार व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार जानिवपूर्वक कर्तव्यात कसूरी करून योग्य प्रकारे चौकशी व कारवाई न करणाऱ्या कासा पोलिसांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार