सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र बँकेचे खाजगीकरण होऊ देणार नाही.

महा बँकेचे खाजगीकरण अर्थमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी.

Sudarshan MH
  • Sep 13 2020 4:10PM

महा बँकेतील कर्मचारी अधिकारी संघटनेची मागणी.
बँक ऑफ महाराष्ट्रा च्या खासगीकरणाच्या विरोधात बँक ऑफ महाराष्ट्रा तील कर्मचाऱ्यांनी केंद्रसरकारच्याविरोधात शपथ घेऊन एक आगळेवेगळे आंदोलन बँकेच्या महाभवना समोर केली आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक बँकेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
व्हॉइस....
काही दिवसांपासून विविध माध्यमातून सरकार पहिल्या टप्प्यात मार्च 2021 अखेर चार ते पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत , ज्यात बँक ऑफ महाराष्ट्र या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा देखील वारंवार उल्लेख करण्यात येत आहे . या बातम्यामुळे महाबँकेतील कर्मचारी तसेच ग्राहक यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि या अनिश्चिततेच्या वातावरणात बँकेचे ठेवीदार अनेक शाखांतून बँकेच्या भवितव्याविषयी सतत विचारणा करत आहेत  या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी वस्तुस्थिती जाहीर करून महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना आणि विशेष करून ठेवीदारांना आश्वस्त करावे अशी विनंती महाराष्ट्र बैंकेतील कर्मचारी तसेच अधिकारी संघटनेने एका पत्रान्वये आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना केली आहे . महाराष्ट्र बँक ही महाराष्ट्र राज्याची अग्रणी बँक आहे . या बँकेच्या महाराष्ट्र राज्यातून 1121 शाखा आणि त्यातील 462 शाखा ग्रामीण भागात आहेत . बँकेने पुरस्कृत केलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाराष्ट्र राज्यात एकूण 412 शाखा असून त्यातील 335 शाखा मराठवाड्याच्या मागास भागात आहेत . या बँकेच्या शाखांचा विस्तार मराठवाडा , विदर्भ , कोकण या मागास भागात लक्षणीय आहे . महाराष्ट्र बैंक नेहमीच शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्ज , बेरोजगारांना देण्यात येणारे मुद्रा कर्ज , सरकारने पुरस्कृत केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहिलेली आहे आणि म्हणूनच ही बैंक राज्यातील सामान्य माणसासाठी जीवनवाहिनी सिद्ध झालेली आहे . राज्याच्या अर्थव्यवस्थेत या बँकचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण राहिलेले आहे . असे असतानादेखील महाराष्ट्र बँकेचे आम्ही अधिकारी कर्मचारी संघटना खाजगीकरण होऊ देणार नाही असे बँकेचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार