सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहशिक्षिका वंदना मनुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते

Sudarshan MH
  • Sep 9 2020 4:17PM
धर्माबाद : दि.8 ( अरविंद जाधव ) 
येथील नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक प्राध्यापक बी. ए. गोणारकर यांच्या सुविद्य पत्नी तथा माजी सभापती राजेश मनुरे यांच्या एकुलत्या एक भगिनी वंदना मनुरे ( गोणारकर ) यांचे नांदेडच्या रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. वंदना मनुरकर ह्या भोकर तालुक्यातील रायखोड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अतिशय कृतिशील शिक्षिका होत्या. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारही प्राप्त झाला होता. तद्वतच त्यांनी लिहिलेल्या ऑनलाइन कथेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. दोन दिवसापूर्वी त्यांची तब्येत अचानक खालावली मलेरिया असल्याची लक्षणे सुरुवातीला दिसत होती म्हणून त्या नांदेडच्या खाजगी रुग्णालयात ॲडमिट झाल्या होत्या. तेथे त्यांना निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यात त्या पॉझिटिव आल्याचे कळाले. नंतर त्यांचा ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यांना विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली .                 
हे वृत्त धर्माबादला कळताच सगळ्यांना मोठा धक्काच बसला, धर्माबाद शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे अंतिम संस्कार करण्यात येईल असे माजी नगरसेवक तथा वंदना मनुरे यांचे बंधू राजेश मनुरे यांनी अतिशय हळव्या मनाने फोनवरून सांगितले..................... भावपूर्ण श्रद्धांजली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार