सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रातील मंदिर, मठ, गुरूद्वारा, वारकरी शिक्षण संस्थेचे वीज बिल माफ करा

महाराष्ट्रातील मंदिर

Sudarshan MH
  • Sep 9 2020 4:02PM
हिमायतनगर दि.8(अरविंद जाधव)कोविड-१९ च्या काळात सर्व मठ, मंदिर, देवस्थान, गुरुद्वारा, वारकरी शिक्षण संस्था, गुरुकुल बंद आहेत. भक्तांच्या दानावर भक्तासाठी अन्नदानासाठी संबंधित खर्च करण्यात येत असतो. महाराष्ट्रातील सर्वच लहान मोठ्या मंदिर, गुरुद्वारा देवस्थान, वारकरी संस्था व गुरुकुल या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. किमान या सर्व मंदिराचे सरकारने वीज बिल माफ करावे अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या भाविक भक्ताकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

देशातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक लहान मोठे देवस्थान सरकारला आर्थिक मदत करत असताना अनेक गुरुद्वारांमधून रोज गरीब जनतेला अन्नदान चालू होते. यामुळे मंदिर देवस्थान गुरुद्वारा व गुरुकुल यांच्यातून नेहमी समाजसेवा किंवा समाजहिताचे मोठे कार्य करण्यात आले आणि आजही चालू आहे. हि बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालून सर्व वारकरी यांच्या असलेल्या भावना लक्षात घेऊन सर्व मंदिर, गुरुद्वारा, गुरुकुल संस्थानचे वीज बिल माफ करावे.

अशी विनंती सर्व राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील राष्ट्रीय वारकरी परिषदेचे तालुका अध्यक्ष ह.भ.प प्रवीण महाराज पार्डीकर, उपाध्यक्ष ह.भ.प कृष्ण महाराज कार्लेकर, सदस्य – ह.भ.प शंकर महाराज पार्डीकर, ह.भ.प परमेश्वर महाराज पार्डीकर, ह.भ.प शिवाजी महाराज पार्डीकर आदींनी तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविले आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, म.रा.मुंबई, ऊर्जामंत्री, म.रा.मुंबई आदींसह इतर संबंधितांना देण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार