सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ मनोहर राठोड

डॉ. मनोहर राठोड यांची हिमायतनगर भाजप वैद्यकीय

Sudarshan MH
  • Sep 9 2020 3:49PM
हिमायतनगर दि.8(अरविंद जाधव)डॉ. मनोहर  राठोड यांची हिमायतनगर भाजप वैद्यकीय आघाडी तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक विविध आघाडी मोर्चा पदाधिकारी निवडीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भाजपची बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची समिती मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय आघाडीची कार्यकारिणी नियुक्तीची बैठक नांदेड येथे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात तमाम जिल्ह्यातील डॉक्टरांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोहर अशोकराव राठोड यांची हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र खा.प्रताप पाटील चिखलीकर, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसाद डोंगरगावकर यांच्या हस्ते दि.०१ सप्टेंबर रोजी नांदेड येथे देण्यात आले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ व्यंकटराव पाटील गोजेगावर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष एड किशोर देशमुख, भोकर विधानसभाध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, डॉ. प्रकाश झरीकर, डॉ. सदाशिव धाबे, आदी मान्यवर, जिल्ह्यातील डॉक्टर्स, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार