सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालघर जिल्हा पोलीसांचे मोबाइल आऊट ऑफ सर्विस

तारापूर अणु उर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापूर औद्योगिक

Sudarshan MH
  • Sep 8 2020 10:32AM
पालघर:  तारापूर अणु उर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापूर औद्योगिक क्षेत्र, #कोरोना महामारी, मुंबई - अहमदाबाद महार्गावरिल रोजचे अपघात, गडचिंचले सारख्या घटना आशा एक ना अनेक समस्यांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या पालघर जिल्हा पोलीसांचे पोलीस अधीक्षक कार्यालय व जवळपास 17 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व ठाणे अमलदार यांचे शासकीय मोबाइल ऩंबरवर संपर्कत होत नसल्याने जिल्हातील अनेक नागरिकांचा मागील 4 दिवसांपासून संपर्कच तुटला आहे. 

पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, ठाणे अमलदार व पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक महत्वपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांना मागील तीन वर्षापासून आयडीया कंपनीने सिम व मोबाइल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचारी बदलले तरी संपर्क क्रमांक तोच व तिथेच राहत असल्याने नागरिकांना हे अधिक सोयीचे झाले होते. यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांचे खाजगीतील संपर्क क्रमांक सर्व सामान्य नागरिकांकडे नाहित. तर बीएसएनएल ची लॉडलाईन सुविधा अनेक पोलीस स्टेशनमधून केंव्हाचीत तडीपार करण्यात आली आहे. 

या सर्व मोबाइलचे बील न भरले गेल्याने कंपनीने या सर्व मोबाइल्सची इन कमिंग व आऊटगोइंग सेवा बंद केल्याचे समजते. बील भरण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निधीच नसल्याने मागील दोन ते तीन महिन्यांपासून अध्याप या मोबाइल्सची बीले भरली नसल्याने पालघर जिल्हा पोलीसांच ऑऊट ऑफ सर्विस झालेची टिका होत आहे. तर नागरिकांना मोठ्या ञासाला समोर जावे लागत आहे. 

हि समस्या कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार