सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ओढकाम व भारवाहतूक करणाऱ्या प्राण्यांना क्रूरतेने वागविन्यास प्रतिबंध

पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या घोड्यांची संख्या

Sudarshan MH
  • Sep 8 2020 10:27AM
पालघर - ( मनीष गुप्ता )  पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या घोड्यांची संख्या व या प्राण्यांचा ओढ्काम, भारवाहतूक घोडेस्वार, लग्नसमारंभ इ. साठी करण्यात येणारा वापर लक्षात घेता घोडे मालकांकडून सदर प्राण्यांवर होत असलेले अत्याचार पाहता या बाबतीत आयुक्त पशुसंवर्धन ह्यांनी जारी केलेल्या पत्रानुसार सदर बाब हि अत्यंत गंभीर असल्याचे निर्देशित केले आहे. सदर घोड्यांना नियंत्रित करण्यासाठी अणुकुचीदार, जखम करणाऱ्या वस्तू, चाबूक, लगाम, इ. गोष्टीचा वापर करण्यात येत असल्याने सदर बाब ओढकाम व भारवाहतूक करणाऱ्या प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध नियम 1965 चे उल्लंघन करणारी असल्याचे भारतीय जीवजंतू कल्याण मंडळ यांनी निर्देशित केले आहे. सदर कामकाजा दरम्यान घोड्यांना नियंत्रित करण्यासाठी अणुकुचीदार, जखम करणाऱ्या वस्तू, चाबूक, लगाम, इ. गोष्टीचा वापर करण्यात येऊ नये. 
सदर प्राण्यांच्या बाबतीत वरील साधनांचा वापर करण्यात येणार नाही व या पासून प्राण्यांना कसलीही शारीरिक इजा होणार नाही याची खबरदारी प्रत्येक घोडे मालकांनी घ्यावी. तसेच ओढ्काम व भारवाहतूक करणाऱ्या प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध नियम 1965 याचे उल्लघन होणार नाही याची दक्षता प्रत्येक घोडे मालकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत ध. कांबळे यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार