सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केमिकल टँक फुटून निघालेल्या रसायनांतील वायू मुळे परिसरात नागरिकांना जाणवला त्रास

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात

Sudarshan MH
  • Sep 7 2020 3:05PM
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी केमिकल टँक फुटून रसायनातून निघालेल्या वायू मुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास जाणवला. कारखाना परिसरात पसरलेल्या वायू मुळे नागरिकांन त्रास जाणवला असून नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं- W 16,25 केमिकॉन केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक विषारी वायू गळती झाल्याने बाजूला असलेल्या कारखान्यातील कामगारांना त्रास होऊ लागला. यावेळी तातडीने बाजूला असलेल्या कारखान्यातील लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तपासणी केली असता एक रसायनाची टाकी फुटून त्यातून वायु निघाला असल्याची माहिती समोर आली आहे.

कारखान्यातील रसायन टाकी फुटून निघालेल्या रसायनातील गँस हा फॉर्मलडीहाईड असून या वायूने डोळ्याला जळजळ होणे, घसा कोरडा होणे व चक्कर येण्याचा त्रास जाणवतो. यातच याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना व पत्रकारांना देखील या वायूचा त्रास जाणवला असून झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आँक्सिजन सिलेंडर लावुन कारखान्यात पसरलेल्या रसायनावर काँस्टीक सोडा टाकून रसायनाची व त्यातुन निघणाऱ्या वायूचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार