सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटरच्या परीसरात मनाई आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे

Sudarshan MH
  • Sep 7 2020 10:16AM
पालघर : (मनीष गुप्ता ) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करण्यासाठी वापरण्यत येणारे  ध्वनीक्षेपक यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  १०० मीटरच्या  परीसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ ,  यांनी लागू केला  आहे.  

     वरील  कारणामुळे  निर्माण होणाऱ्या गजबजाटात कार्यालयात काम करणे अशक्य होते . तसेच या कार्यालयासमोरील रस्त्यालगतची जागा खाजगी असून ती निमुळती असल्याने सदर ठिकाणी मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोकोकर्ते यांनी मंडप उभारल्याने अथवा ते सदर ठिकाणी उभे राहील्याने सदरच्या जागेवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही . तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हे खाजगी इमारतीत असल्याने व त्यासमारे उपोषणकर्ते , आंदोलनकर्ते यांचेसाठी मंडप उभारणे अथवा उभे राहणेकरीता पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच या भागात रासायनिक कंपन्या असल्याने त्यांचे अवजड वाहनांची ये - जा होत असल्याने वाहनांचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता , सदर जागेत मोर्चे , उपोषणे , धरणे , रास्ता रोको व आंदोलनकर्ते यांना जिल्हाधिकारी कार्यालय , पार्श्वनार्थ ९ इमारत , बिडको नाका , नवली , ता.जि.पालघर पासून १०० मीटरचे परीसरात प्रवेश करण्यास जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. 

 फौजदारी प्रक्रीया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( २ ) ( ३ ) अन्वये कार्यालयापासून १०० मीटरचे परीसरात विवीध राजकीय पक्ष व विविध संघटना तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करण्याऱ्या व्यक्तींना सार्वजनिक रितीने घोषणा देणे , गाणी म्हणणे , ध्वनीक्षेपक ( लाऊडस्पिकर ) सूरु ठेवणे , वाद्य वाजवणे कार्यालयासमोर मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करण्याकामी प्रवेश करण्यास दि .०५ / ० ९ / २०२० रोजी ००.०१ वा.पासून ते दि .०३ / ११ / २०२० रोजी २४.०० वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला  आहे . 
सदरचा मनाई आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांकरीता शासकीय , निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी , विविध उपक्रमांकरीता आमंत्रित करण्यात येणारे शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी व खाजगी व्यक्ती , शासकीय कामकाजानिमित्त येणारे नागरीक ,

फौजदारी प्रक्रीया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( २ ) ( ३ ) अन्वये राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या व्यक्ती , तसेच विवीध राजकीय पक्ष व विविध संघटना , तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे , उपोषणे , धरणे , आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या ज्या व्यक्ती जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेकामी येणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागाची परवानगी घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत येतील अशा ५ पेक्षा कमी संख्येने येणाऱ्या व्यक्ती यांना सदरचा मनाई आदेश लागू राहणार नाही .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार