सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहाद्यात गोमांस विक्रीवरून दोन मुस्लिम गटात राढा

नंदुरबार - गोमांस विकायला आणल्या विषयी हरकत घेतल्यावरून

Sudarshan MH
  • Sep 2 2020 6:51PM
     सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी) :नंदुरबार - गोमांस विकायला आणल्या विषयी हरकत घेतल्यावरून मुस्लिमांच्या दोन गटात जबरदस्त धुमश्‍चक्री झाली आणि लोखंडी रॉड, सळंया, टाँमी, लाकडी दांडे  यांचा सर्रास वापर करण्यात आला. यामुळे दोन्ही गटातील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत तर 20 हून अधिक जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
 या दोन्ही गटांनी शहादा येथील गरीब नवाज कॉलनी परिसर आणि पाडळदा चौफुली परिसरात एकमेकांवर हल्ला केल्याच्या या घटना घडल्या. सोहेल कादर शेख वय 32 यांंने फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार जुबेर खान कुरेशी,  फरीद खान कुरेशी, सलमान कुरेशी हे तिनही जण एम एच 39 जे 6794 क्रमांकाच्या रिक्षेतून गोमांस विक्री करत चालल्याचे दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता आढळून आले. म्हणून सोहेल आणि त्याच्या भावाने त्यांना हटकले व गोमांस विक्रीला का आणले अशी विचारणा करीत अडवले होते. त्यावरून संतप्त झालेल्या कुरेशी बंधूंनी आणि त्यांच्या साथीदारांनी पाडळदा चौफुलीवर सोहेल आणि त्याच्या भावांवर लाकडी दांडे सळ्या लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला. रियाज लतिफ, कमिल रज्जाक, इरफान कयूम वगैरे यात जबर जखमी झाले. दुसऱ्या बाजूने इरफान मुक्तार कुरेशी याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की समाजाची वर्गणी म्हणजे चंदा मागितल्या वरून कमिल कुरेशी,  रियाज मेंबर, वगैरेंना राग होता. या रागातून या आरोपींसह दहाहून अधिक लोकांनी लोखंडी रॉड टॉमी लोखंडी सळ्या लोखंडी दांडे घेऊन हल्ला केला यामुळे रिजवान कुरेशी अमीर कुरेशी इरफान कुरेशी हे तीन जण जबर जखमी झाले. शहादा येथील रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले असून शहादा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार