सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन व मराठा सेवा संघाचे नांदेचे आधारवड शे रा पाटील साहेब यांचा सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

दि.१सप्टेंबर २०२० रोजी मंगळवार मराठा सेवा संघाचा 30वा वर्धापन

Sudarshan MH
  • Sep 2 2020 3:12PM
नांदेड दि.2(अरविंद जाधव) 
दि.१सप्टेंबर २०२० रोजी मंगळवार मराठा सेवा संघाचा 30वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण मराठा मुलांचे वसतिगृह नवा मोंढा नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या वेळी मराठा सेवा संघ नांदेडचे आधारवड आदरणीय शेरा पाटील यांचा सेवापूर्ती सह्दयी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रभान पाटील जवळेकर मामा होते. या कार्यक्रमात मराठा सेवा संघ व त्यांचे कार्य यावर अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष एन जी कल्याणकर यांनी केले.त्यानी नांदेड मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकातून सादर केला. अनेक वक्त्यानी मार्गदर्शन केले त्यामध्ये प्राचार्य डॉ. पंजाबराव चव्हाण यांनी सेवा संघाच्या वाटचालीची माहिती दिली.डॉ विठ्ठल भाऊ पावडे यांनी यावेळी सांगितले की मराठा सेवा संघामुळेच हजारो तरुण घडले आणि त्यांना विधायक दिशा मिळाली .माजी अध्यक्ष पंडितराव कदम यांनी सेवा संघाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सेवा संघाच्या 33 कक्षाची कार्यनिहाय माहिती असावी असे प्रतिपादन केले. मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रा.संतोष देवराये यांनी यावेळी मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला हजारो लेखक,वक्ते दिलेत आणि सर्व पक्षांना नेते व वक्ते पुरवणारी संघटना आहे असे प्रतिपादन केले. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा शिवमती सरस्वती ताई धोपटे यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आत्मनिर्भर ,व्यवसायभिमुख बनवणारी संघटना आहे असे सांगितले. जिजाऊ ब्रिगेडच्या  जिल्हाध्यक्षा शिवमती अरुणाताई जाधव यांनी महिलांना अंधश्रद्धेपासून दूर नेऊन महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करणारी संघटना असल्याचे सांगितले.संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी तरुणांच्या हातातील तलवार काठ्या काढून त्यांच्या हातात पेन पुस्तके संघाटनेनी दिली. त्यामुळे आमच्यासारख्या तरुणांना शिक्षणाचे महत्त्व कळाले.असे सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवानराव कदम,श्याम पाटील कुशावाडीकर यांनीसुद्धा आमच्या सारख्या हजारो तरुणांना लढण्याचे,शेती व्यवसाय करण्याचे सामर्थ्य सेवा संघामुळे मिळाले असे सांगितले.व्याख्याते,लेखक  शिवश्री रमेश पवार यांनी सेवा संघाच्या 33 कक्षाचे कार्य कसे चालते यावर सविस्तर मार्गदर्शन केले.अॅड सतीश जाधव यांनी मराठा सेवा संघामुळे माझ्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल कशा प्रकारे घडून आला याविषयी माहिती दिली.त्यानी वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त होणारा खर्च टाळून मराठा सेवा संघाच्या मुलीच्या वस्तीग्हास पाच हजार रुपयांचा चेक यावेळी दिला. प्रा.डॉ. गणेश शिंदे यांनी मराठा सेवा संघाने तीस वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात दिलेल्या योगदान बद्दल विस्तृतपणे माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात आदरणीय चंद्रभान पाटील जवळेकर यांनी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचार आणि मराठा सेवा संघाचे विचार याची सांगड घालून त्याचे महत्त्व सांगितले .याच कार्यक्रमात मराठा सेवा संघ नांदेडचे आधारवड आमचे सर्वांचे मार्गदर्शक निस्पृह व्यक्तिमत्व इंजि. शे रा पाटील साहेब यांचा सेवापूर्ती निमित्त सह्दयी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी मराठा सेवा संघाचे सर्व आजी माजी  पदाधिकारी सर्व कक्षाचे आजी माजी पदाधिकारी यांनी शिवेच्छा देवून पुढील कार्यासाठी अंतःकरणपूर्वक सदिच्छा व्यक्त केली.सत्काराला उत्तर देताना इंजि शेरा पाटील यांनी पूर्णवेळ मराठा सेवा संघाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणार असे सांगितले. सरतेशेवटी डॉ.विठ्ठल पावडे यांनी अशा या महान, निस्वार्थी समाजासाठी काम करणाऱ्या माणसाचा जिवंतपणी पुतळा तयार करावा एवढे महान कार्य या माणसाचे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जिल्हा गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी पाटील बामणीकर यांनी केले .
तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर शिंदे नायगावकर यांनी केले. या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये शिवश्री चंद्रभान मामा जवळेकर ,प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण, प्रा डॉ गणेश शिंदे सर ,प्रा संतोष देवराय सर, शिवाजी राजे पाटील ,डॉ सोपानराव शिरसागर ,एन जी कल्याणकर, श्यामसुंदर शिंदे,पंडितराव कदम ,पंडित पवळे, उद्धवराव सूर्यवंशी, अड. सतीश जाधव , रमेश पवार सर ,चंद्रशेखर कदम , प्रा कौशल्य सर,शिवमती सरस्वतीताई धोपटे, शिवमती अरुणा ताई जाधव ,शिवमती वनिताताई देवसरकर, शिवमती जयश्रीताई भायगावकर ,शिवमती राणीताई दळवी , संकेत पाटील ,भगवानराव कदम, श्याम पाटील खुशावाडीकर, सुभाष कोल्हे ,वीर भगतसिंग  विद्यार्थी परिषदेचे  जिल्हाध्यक्ष  संगमेश्वर लांडगे ,परमेश्वर पाटील तसेच मराठा सेवा संघ  व सर्व  कक्षांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार