मलकापूर मतदारसंघात गोदाम बांधकामाचे भूमिपूजन.....
मलकापूर कॉ. ऑप.जिनिंग अँड प्रेसिंग फॅ.लिमिटेड मलकापूर या संस्थेने
बुलढाणा : दि मलकापूर कॉ. ऑप.जिनिंग अँड प्रेसिंग फॅ.लिमिटेड मलकापूर या संस्थेने आपल्या मालकीच्या राष्टीय महामार्ग क्र.6 वरील जागेवर मलकापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे भव्यदिव्य ,अत्याधुनिक स्वरूपाचे 23 हजार स्वे. फूटाच्या गोदाम बांधकामाचे भूमिपूजन मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.राजेश एकडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अरविंद कोलते, संचालक देवेंद्र पाटील(अप्पासाहेब), व्यवस्थापक गजानन मिरगे,बंडू भाऊ चौधरी,डॉ. अनिल खर्चे सर, समाधान इंगळे सर, सुरेश पाटील, अनिरुद्ध तायडे, पंकज सुरंगे,पवन देशमुख आदी मान्यवर व शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
सहा महिन्यांच्या आत शेतकऱ्यासाठी सदर आधुनिक स्वरूपाचे गोदाम उपलब्ध करून दिल्या जाईल असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद कोलते साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प