सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर कोरोना पॉझिटिव्ह, शासकीय रुग्णालयात उपचार

जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना कोरोनाची

Sudarshan MH
  • Sep 1 2020 7:19PM
नांदेड दि.1(अरविंद जाधव) जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवार, 31 ऑगस्ट रोजी त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने माध्यमांना जारी करण्यात आली आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे लॉकडाऊन व संचार बंदी काळात जनतेच्या अडचणी व मदत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत स्वत: रस्त्यावर उतरून जनतेला प्रशासनाने जे नियम घालून दिले त्याची अमल बजावणी करत होते.
नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांना कोविड ची लक्षणे दिसू लागल्याने 30 ऑगस्ट रोजी त्यांनी विनाविलंब तपासणी करून घेतली. 31 ऑगस्ट रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कोणत्याही मेट्रो सिटीत उपचारासाठी दाखल न होता नांदेड येथील कोविड शासकीय रुग्णालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, तीन आमदार, उपमहापौर यांच्यासह अनेक अधिकार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा संपर्कातील अनेकजणांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी स्वत: देखील नांदेड येथील रुग्णालयात कोविडचे उपचार घेत असल्याची माहिती दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार