सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

JEE NEET परीक्षाकरीता विद्यार्थ्यांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी द्या : अभाविप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी हित जोपासून कार्य करत

Sudarshan MH
  • Aug 31 2020 4:23PM
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी हित जोपासून कार्य करत आलेली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देखील विद्यार्थी परिषद अनेक सेवा कार्य करत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांच निराकरण करण्याच कार्य देखील करत आहे. 
"जेई व नीटच्या परीक्षा येत्या सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. कोविड -१९ पार्श्वभूमिकर अनेक समस्यांना तोंड देत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताची काळजी घेण्यात यावी तसेच विद्यार्थ्याना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात." अशी मागणी अभाविप राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी केली
विद्यार्थ्यांच आरोग्य हिताच्या दृष्टीने अभाविपने मुख्यमंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या आहेत. 
१) परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची अनुमति द्यावी.
२) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष एस.टी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.
३) लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी. 
४) परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रात सोशल डिस्टनसिंग तसेच ईतर शासनाच्या नियमांच पालन करण्यात याव. 
५) सर्व परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सिनिटाईज करण्यात यावी. व सर्व केंद्रांवर प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. 

( सदर प्रसिद्धीपत्रक मुंबई कार्यालय येथून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार