सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरोग्य अधिकार्याच्या मणमानी विरोधात रूई छत्रपती ग्रामस्थ एकवटले आरोग्यमंत्र्यांना निवेदन

सुपा :- रूई छ्त्रपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या

Sudarshan MH
  • Aug 30 2020 7:36PM
सुपा :- रूई छ्त्रपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकि अधिकारी डॉ.अश्विनी गुंजाळ यांचे कामांमध्ये वारंवार अनियमितता आढळून येत आहे.तसेच रुग्णांना पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत नाही.रुग्णांचे व्यवस्थित उपचार केले जात नाही व त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी रूई ग्रामस्थांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले की,रुग्ण सेवा सुविधा न दिल्यास व त्यांचेवर तक्रार केल्यास सरकारी कामांमध्ये अडथळा आणला असा गुन्हा दाखल करील अशी धमकी हे वैद्यकीय अधिकारी देतात.वृद्ध व्यक्तींची सुद्धा अरेरावीची भाषा वापरली जाते.याबद्दल ग्रामस्थांचा तक्रारींची चित्रफीत व्हिडिओ शूटिंग तसेच ऑडिओ उपलब्ध आहेत.तसेच त्यांचे विरोधातील तक्रार अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वारंवार देण्यात आलेले आहेत.तसेच 15 ऑगस्ट 2020 रोजी सरकारी निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र रुई छत्रपती येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी पार पडला.ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताना तेथे लोकप्रतिनिधी,माजी सैनिक,कोरोना योद्धा व काही ग्रामस्थ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी हजर होते परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी गुंजाळ या गैरहजर होत्या या गोष्टीचा पुरावा म्हणून त्यावेळी फोटो काढलेले आहेत.परंतु त्यांनी उशीरा आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना बरोबर ध्वजस्तंभ फोटो काढले सदर वैद्यकीय अधिकारी ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रमास गैरहजर राहिल्यामुळे व रुग्णांच्या हेळसांड यामुळे त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागनी करन्यात आली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार