सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपातर्फे संगमनेर शहर व तालुक्यात घंटानाद आंदोलन

राज्‍यात दारूची दुकाने, मॉल्‍स सुरू करण्‍यात

Sudarshan MH
  • Aug 30 2020 5:18PM

संगमनेर:- राज्‍यात दारूची दुकाने, मॉल्‍स सुरू करण्‍यात आली आहेत. त्‍याठिकाणी करोनाची भीती नाही. मग केवळ प्रार्थना स्‍थळांमध्‍ये करोनाची भीती या सरकारला वाटत असल्याचे म्हणत देशात सर्वत्र प्रार्थनास्थळे सुरू असताना महाराष्ट्रातच बंद का? असा सवाल भाजप नेते व कार्यकर्त्यांनी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाविरोधात भाजपातर्फे संगमनेर शहरात व तालुक्यात आयोजित घंटानाद आंदोलनात ६० ते ७० गांवात यशस्वी करण्यात आले.

महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद आहेत. गेली सहा महिने मुख्‍यमंत्र्यांनी जे जे आवाहन केले ते आम्‍ही नियम पाळून मान्‍य केले, त्‍यावर अमल केला. मात्र आता नियम पाळून प्रार्थनास्‍थळे उघडा अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. नागरिकांना आपल्‍या श्रध्‍दास्‍थानासमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी राज्‍यातील सर्व प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी.
भाजपातर्फे आज मंदीर, मशीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्‍यात आले.
राज्‍यात दारूची दुकाने, मास विक्री, मॉल्‍स, बसेस, व्‍यापार सर्व सुरू असताना केवळ प्रार्थनास्‍थळे बंद असणे ही बाब निश्‍चीतच सर्वधर्मीय नागरिकांना न रूचणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाला सांगून सर्व प्रार्थनास्‍थळांसमोर सावधानीचे उपाय सांगणारी नियमावली शासनाने प्रसिध्‍द करावी व सर्वधर्मीयांना त्‍यांच्‍या आराध्‍यांचे दर्शन घ्‍यायची मुभा द्यावी. देशात सर्वदूर प्रार्थनास्‍थळे उघडी असताना महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद का? हा प्रश्‍न अनाकलनीय आहे, असेही  मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, शीख, बुध्‍द व हिंदू धर्माच्‍या सर्व प्रमुख आंदोलनात सहभागी झाल्‍याबद्दल त्‍यांनी आभार व्‍यक्‍त केले. यावेळी *"दार उघड उध्‍दवा, दार उघड..”* असे नारे देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी घंटानाद केला. सर्व धर्माच्‍या प्रमुखांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत राज्‍य सरकारवर जोरदार टिका केली.

यावेळी सोशल डिस्‍टन्‍सिंग पाळत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर भाजपा तालुका अध्यक्ष  *डॉ.अशोक इथापे* यांच्‍या नेतृत्‍वात माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,नगरसेवीका सौ मेघाताई भगत, अॅड श्रीराम गनपुले, ज्ञानेश्वर कर्पे, राजेश चौधरी, सुधाकर गुंजाळ सर, बुवाजी खेमनर, सिताराम मोहरिकर, अॅड दिपक थोरात, मधुकर वाळे, शिरिष मुळे, राजेश दिघे, दिपक भगत, हरिश चोकोर, सूदाम ओझा, वाल्मीक शिंदे, भाऊसाहेब हासे, ज्ञानेश्वर घुगे, हाफिज शेख, नेताजी घुले, डाॅ महेंद्र कोल्हे, सोमनाथ नेहे, हारिभाऊ गीते, बाबुराव खेमनर, बाळासाहेब खेमनर, किशोर गुप्ता, दादापाटील नेहे, शिवकुमार भंगीरे, वैभव लांडगे, सुनील खरे, योगीराज परदेसी, विकास गुळवे रोहीत चौधरी, शैलेश फटांगरे, अशोक शिंदे, सचीन केरे, दिपेश ताटकर,  सहदेव जाधव, संपत गेठे, बाळासाहेब देशमुख, लहानु नवले, रामनाथ शिंदे, राहुल भोईर, दत्ताञय दिघे, नवनाथ वावरे, श्रीकांत कडलग, मयूर बिडवे, रोहीदास साबळे, अरूण पवार, सोमनाथ नेहे, माजीदभाई  अत्तार, अरुण शिंदे, अमोल जेडगुले, पुंजाभाऊ दिघे,   साहेबराव आखाडेबाबा, मुरलीधर सिनारे या शिष्ठमंडळाने मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केले,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार