सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चिखली पोलीसांची गुटखामाफीयांवर वक्रदृष्टी , 48 तासात 2 री कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त,।।

बुलढाणा : लॉकडाऊनच्या काळात सर्रासपणे सुरु

Sudarshan MH
  • Aug 30 2020 1:46PM
योगेश शर्मा)
बुलढाणा : लॉकडाऊनच्या काळात सर्रासपणे सुरु असणाऱ्या गुटखाविक्रीवर मागील 48 तासात चिखली पोलीसांची वक्रदृष्टी वळल्याने गुटखामाफीयांचे धाबे दणाणले आहेत. चिखली पोलीसांनी दि.29 ऑग्स्टच्या रात्री 4,21,240 रु  गुटखा माल व वाहन किंमत 400000 रु असा एकूण 8,21,240 चा माल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे मागील 48 तासात चिखली पोलीसांची ही दुसरी कारवाई असून दोन्ही कारवायांमध्ये गुटखा मालक फरार होण्यात यशस्वी झाला असल्याने पोलीसांना आपल्याच झारीतील शुक्राचार्यांचा प्रथम शोध घ्यावा लागणार आहे.
यासंदर्भात चिखली पोलीस स्टेशन कडुन प्राप्तं माहितीनुसार बुलडाणा ते चिखली रोड वर 407 वाहनामधुन मोठया प्रमाणावर शासन प्रतिबंधीत गुटख्याचे वाहतुक होणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यावरुन चिखली पोलीसांनी 29 ऑगस्टं चे मध्यरात्री पथकाने ग्राम हातणी समोर नाकाबंदी केली असता  टाटा 407 वाहन क्रमांक MH 28 AB 5499  त्यांना चिखलीकडे येतांना दिसून आले. पोलिसांना नाकाबंदी करत असतांना  त्या वाहनाचा चालक जागेवरच वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन लगतच्या शेतामध्ये पसार झाला. पोलीसांनी चालकाचा शोध घेतला पण मिळून आला नाही. तेव्हा लागलीच पंचासमक्ष त्या वाहनाची पाहणी केली असता त्या वाहनांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची  एकूण लहान मोठी 23 पोते ज्याची किंमत 4,21,240 रु  गुटखा माल व वाहन किंमत 400000 रु असा एकूण 8,21,240 चा माल मिळून आल्याने तो जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये आणून वाहन चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ श्री  दिलीप पाटील भुजबळ , अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते  यांचे मार्गदर्शनाखाली चिखली ठाणेदार गुलाबराव वाघ  यांचे निरीक्षणाखाली चिखली पो स्टे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार दवणे , पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे, पोहवा धारकरी, नापोका राजू सोनुने,सदानंद चापले, रणजित हिवाळे, शेगोकार, यांनी कारवाई केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार