चिखलीत पुन्हा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी केला जप्त..
घरात साठवून ठेवलेला 'जी-वन झटका' नावाचा प्रतिबंधित गुटखा मिळालेल्या गुप्त माहितीच्या
(योगेश शर्मा)
बुलढाणा : येथील माळिपुरा परिसरात असलेल्या घरात साठवून ठेवलेला 'जी-वन झटका' नावाचा प्रतिबंधित गुटखा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर चिखली पोलिसांनी जप्त करून दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील घर मालक याला पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी गुटखा मालक फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुण वार्ड नंबर 9, माळीपुरा भागातील रहिवाशी असलेले यासीन खाँ अब्दुला खाँ याच्या राहत्या घरावर छापा टाकले असता त्यांच्या घरातून 'जी-वन झटका' नावाचा प्रतिबंधित गुटख्याचे सात पोते मिळून आले. यावरून चिखली पोलिसांनी घर मालक यासीन खाँ अब्दुला खाँ याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर माल हा शेख रईस शेख अफसर यांच्या मालकीचा असून त्यांनी तो माझ्या राहत्या घरात आणून ठेवल्याची माहिती दिली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींविरोधात कारवाई करत असल्याची माहिती दिली. सदर कारवाई ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप.निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोलिस हवालदार शशिकांत धारकरी, पो.ना. सुनील सोनुने, पो.ना. गोरखनाथ राठोड यांनी कारवाई केली असून ताब्यात घेण्यात आलेल्या मालाची अंदाजित मुल्य जवळपास तीन लाख रु. असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प