सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युवकाची हत्या….काही तासातच बोईसर पोलीसांनी लावला छडा…

मिञांनीच केली हत्या….हत्यारा मयत युवकाच्या कुटुंबीयांसमवेत बेपत्ता मिञाचा शोध घेण्यात मदत करण्याचा करत होता बनाव”

Sudarshan MH
  • Aug 29 2020 11:31AM
बोईसर : काल संधाकाळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एएम 1 या गंगोञी हॉटेल समोरील खुल्ल्या मैदानात बेपत्ता युवक शिवरत्न रॉय उर्फ शिवमचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रेम संबंधातील संशय व वादातून मिञांनीच मिञाची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हत्या करणाऱ्या दोन मिञांपैकी एक मिञ मयत शिवमच्या कुटुंबीयांसमवेत बेपत्ता शिवमचा शोध घेण्यासाठी फिरून “तो मी नव्हेच” या अविर्भावात वावरत असल्याचा बनाव उघड झाला आहे.

या हत्याकांड प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीसांनी अबुझर सिद्धीकी व आरिफ खान या दोघांना ताब्यात घेतले आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दितील अवधनगर रोशन गँरेज गल्ली येथे राहणारा शिवरत्न राँय उर्फ शिवम हा शनिवारी 22 आँगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर पब्जी खेळत असताना त्यांचा मित्र अबुझर लयीयास सिद्धीकी (वय 19), याने व्हाट्सएप काँल करून बाहेर बोलवले होते. घरात काहीही न सांगता मोबाइल घरीच ठेऊन बेपत्ता झालेल्या शिवम राँय याचा मृतदेह काल बुधवार दि. 26 आँगस्ट रोजी सायंकाळी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. आरोपी अबुझर सिद्धीकी याची पोलीसींनी चौकशी केली असता, यानेच शिवमला बाहेर बोलवून घेतले होते. त्यानंतर त्यांनी शिवमला गंगोत्री हाँटेल समोर असलेल्या मैदानात वाढलेल्या झाडीत निर्जन स्थळी नेऊन त्याला मारहाण करत, त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारल्याचे उघड झाले असून, या हत्याकांडात अबुझर सिद्धीकीला त्याचा मिञ आरिफ खान यांने मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांनीच शिवमचा मृतदेह झाडीत टाकला होता.

बोईसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील व पो.शि. वैभव जामदार, अशपाक जमादार, देवा पाटील, वाघचौरे, मर्दे इ. यांनी गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करत आरोपी अबुझर लयीयास सिद्धीकी व आरिफ खान याला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप कसबे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार