कल्याण कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने तलावात टाकून पुरावा नष्ट करणाऱ्या इसमास अटक करण्यात कल्याणच्या गुन्हे शाखा, युनिट- ३ ला यश आले आहे.
कल्याण कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह नष्ट करण्याच्या
कल्याण कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने तलावात टाकून पुरावा नष्ट करणाऱ्या इसमास अटक करण्यात कल्याणच्या गुन्हे शाखा, युनिट- ३ ला यश आले आहे.
कल्याण - ( मनीष गुप्ता ) याबाबत वृत्त असे आहे कि, गुप्त बातमीदाराकडून पो ना. खिलारे यांना माहिती मिळाली कि, क्लासिक हॉटेलच्या पानटपरी मधील काम करणाऱ्या कामगारांची दोन ते चार दिवसांपूर्वी भांडणे झाली आहेत. सदर भांडणात एका मुलास जीवेठार मारण्यात आले आहे. सदर मिळालेल्या माहितीवरून युनिट कार्यालयाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथकाने सदर कामगार राहत असलेल्या ठिकाणी जाऊन सदर बाबत माहिती प्राप्त करून सुनील श्रीराजबा पटले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने स्वतः इतर दोन कामगारांसह त्याचा कामगार सुरीज स्वरुपवा पाल यास पानटपरीच्या गल्यातील पैसे चोरी केल्याच्या कारणावरून वादविवाद करून लाकडी दांडका, गॅसचा पाईप आणि कमरेचा पट्टा याने मारहाण करून त्याचे डोके जमिनीवर आणि भिंतीवर आपटून जीवेठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून प्रेत गोणीत भरून क्लासिक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दलदल युक्त तलावात टाकून दिले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मानपाडा पोलिसांनी सदर तलावातून मृतदेह बाहेर काढला.
सदर प्रकरणी आरोपी सुनील श्रीराजबा पटेल व इतर दोन यांच्या विरुद्ध मानपाडा पो. स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास अपर पो आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्ता कराळे, पो. उप आयुक्त परिमंडळ – ३, कल्याण विवेक पानसरे, सहा. पो. आयुक्त डोंबिवली विभाग मोरे, वपोनि दादहरी चौरे, मानपाडा पो.स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) तांबे मानपाडा पो. स्टे. हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, सह.पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रवीण पवार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) दिपक देवराज, सहा.पोलीस आयुक्त (शोध – १) गुन्हे शाखा किसन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक – ३, कल्याण गुन्हे शाखा युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन, स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन, पो.हवालदार – दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे,मंगेश शिर्के,अजित राजपुत, सुरेश निकुळे, बाळा पाटील, हरीचंद्र बंगारा, राहुल ईशी यांनी केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प