सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकर्‍यांची F.R.P. व R.S.F. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने त्वरित द्यावी - माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी...!

जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेला भाऊराव चव्हाण

Sudarshan MH
  • Aug 28 2020 10:26PM
नांदेड दि.28(अरविंद जाधव) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक ४ ने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चालू वर्षाची F.R.P. रक्कम द्यावी तसेच R.S.F. 2016 ते 2017 वर्षाची थकीत रक्कम देऊन युनिट क्रमांक चार च्या विक्रीची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे  केली आहे हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

चालू वर्षाच्या गळित हंगामात 11.62 उसाचा साखर उतारा आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाने चालू वर्षात प्रतिटन दोन हजार चाळीस रुपये प्रमाणे भाव दिला आहे. बाकी राहिलेली प्रतिटन रक्कम 507 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच R.S.F. सन 2016 ते 2017 वर्षाची थकीत रक्कम प्रतिटन 615 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांची पूर्ण बाकी रक्कम मिळत नाही तोपर्यंत कारखान्याची खरेदी विक्रीची प्रक्रिया करू नये तसेच शेतकऱ्यांचे पैसे बाकी ठेवून कारखान्याची विक्रीची प्रक्रिया पूर्ण होणार असेल तर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी युनिट क्रमांक चार ला कुलूप ठोकण्याचा ईशारा माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी दिला आहे.

तालुक्यातील नेतेमंडळी खरोखरच भाऊराव चव्हाण कारखान्याने कोट्यावधी शेतकऱ्यांची थकवलेली रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी  टाकतील काय ? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.  विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार