सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारनेरचे आमदार निलेश लंके रिक्षा चालवत कुठे चाललेत.......।। वाचा

पारनेर तालुक्यामधील मांडओहळ धरण

Sudarshan MH
  • Aug 28 2020 10:13PM
  अहमदनगर   पारनेर तालुक्यामधील मांडओहळ धरण व तिखोल पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले या दोन्ही ठिकाणचे जल पूजनाचा कार्यक्रम तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडला निलेश लंके  कर्जुले हर्या  मधून रिक्षा चालवत डेमवर पोहचले व पाणीपुजन केले
          तालुक्याची जीवनदायिनी म्हणून समजले जाणारे, 399 दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असणारे व 2266 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार इतकी क्षमता असणारे मांडओहळ धरण ज्या धरणावर आज किमान अकराशे ते बाराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.1983 शाली तयार झालेले धरण या धरणाचा विस्तार किमान एक ते दीड किलोमीटर इतका असून या धरणामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या माळरान पडीक जमिनीला बागायती जमिनीचे रुप आले आहे. 
        नोव्हेंबर 2019 मध्येही हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. व त्याचे जलपूजन ही पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे 
 आमदार निलेश लंके यांनी केले होते. व शुक्रवारीही या जलपूजन समारंभा साठी आमदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शविली व जलपूजन केले .
         विधानसभा निवडणूक प्रचार सभेत निलेश लंके हे वारंवार सांगत होते की पारनेर तालुक्यातील अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार व निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले व त्या वेळीही आमदार निलेश लंके यांनीच जलपूजन केले होते. व ऑगस्ट 2020 मध्येही ही हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. व त्याचे जलपूजनही आमदार लंके यांच्या हस्ते झाले.व शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली आले .
       
        यावेळी आमदार निलेश लंके यांच्या समवेत, प्रतिष्ठानचे अध्यक्षा बापू शिर्के,रामदास दाते, गंगाराम उंडे,सुनील मुळे, युवराज मुळे,कृष्णा आंधळे,विष्णू दाते,विष्णू गुरुजी,शशिकांत आंधळे, दत्ताशेठ आंधळे,संतोष हांडे,विलास गाजरे,माऊली गाजरे,संग्राम उंडे,शरद उंडे यांच्यासह संदीप ठाणगे, सतीश भालेकर,संभाजी वाळुंज,शिवाजी ठाणगे, गणेश ठाणगे,यांच्यासह तिखोल,कर्जुले हर्या व टाकळी ढोकेश्वर गावातील अनेक ग्रामस्थ,शेतकरी बांधव,निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार