सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे अनंत चतुर्दशी दिनी गिरगाव चौपाटी येथे वार्तांकन करण्यासाठी प्रवेशपत्र देण्याची व्यवस्था

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या

Sudarshan MH
  • Aug 27 2020 10:42AM
बई - ( मनीष गुप्ता )बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनंत चतुर्दशी दिनी गिरगाव चौपाटी येथे वार्तांकन करण्यासाठी प्रवेशपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
तथापि, 'कोविड १९' च्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी काटेकोरपणे घेणे व त्यानुसार दिलेल्या सूचनांची परिपूर्ण अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने 'मास्क' वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे; यासारख्या बाबींचा समावेश आहे.
..
वरील तपशील लक्षात घेता यंदा प्रत्येक संस्थेतील जास्तीत जास्त दोन व्यक्तींना प्रवेश पत्रे देण्यात येतील. यामध्ये छायाचित्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
..
वरीलनुसार ज्यांना गिरगाव चौपाटी येथे वार्तांकन करावयाचे असेल त्यांनी आपली दोन छायाचित्रे, माध्यम संस्थेद्वारे देण्यात आलेल्या ओळखपत्राची छायाप्रत आणि आपल्या आधारकार्डाची छायाप्रत ही - जनसंपर्क विभाग, कक्ष क्रमांक २४, तळ मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२० पूर्वी जमा करावी, ही नम्र विनंती. ओळखपत्रांचे वितरण हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात येईल.
..
याच अनुषंगाने नम्र विनंती करण्यात येत आहे की, 'कोविड - १९' च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ज्यांना गिरगाव चौपाटी येथे उपस्थित राहून वार्तांकन करणे आत्यंतिक गरजेचे असेल त्यांनीच कृपया या सुविधेचा लाभ घ्यावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार