जिजाऊ ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी "अरूणा जाधव" यांची निवड
जिजाऊ ब्रिगेडच्या
नांदेड दि.२५(अरविंद जाधव)जिजाऊ ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सौ.अरुणा जाधव यांची निवड करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील कार्याची विशेष आवड , चारित्र्य संपन्नता, संघटनेबद्दल ची आत्मीयता, समाज परिवर्तन बद्दलची तळमळ, संघटनात्मक कौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता, संघटना बाधनी बद्दल ची तन, मनाने,धनाने असणारी तळमळ, महिला सक्षमीकरण अथवा महिला सबलीकरण आधी कार्यामध्ये अंगी असलेली धडपड पाहता मराठा सेवा संघ प्रणित नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ माधुरी भदाणे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव सौ. सारिका अंभोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे, सौ. सीमा बोके जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारणी च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या, एक कुशल संघटक, दमदार नेतृत्व, सौ .अरुणा जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे. नांदेड दक्षिण च्या कार्यक्षेत्रात बिलोली, धर्माबाद, देगलूर, नायगाव, मुखेड ,कंधार ,लोहा आधी तालुक्याचा समावेश आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरुण जाधव यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून त्यांनी यापूर्वी मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मोर्चे, आंदोलने ,सभा, धरणे आंदोलन आधीच्या माध्यमातून प्रशासनाला अथवा सरकार दरबारी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून समाजातील महिलांना रंजल्या-गांजलेल्याना न्याय देण्याचे सतत त्यांनी कार्ये केलेले आहे, त्यांच्या या कार्याची पावती म्हणून मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यांच्या निवडी बद्दल नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, कृषी परिषद, शिक्षक परिषद, छावा संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, विविध पक्षांचे नेते पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिले आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प