सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अखेर विजयराज शिंदे भाजपमध्ये दाखल,फडणवीसांनी केले स्वागत..

फडणवीसांनी केले स्वागत..

Sudarshan MH
  • Aug 25 2020 9:17PM
योगेश शर्मा
बुलडाणा :-बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजयराज शिंदे  यांनी आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी बुलडाणा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर,प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे, बुलडाणा भाजपचे योगेंद्र गोडे यांची उपस्थिती होती.
 1995 पासुन अनेकदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडुन येणाऱ्या विजयराज शिंदे यांचे शिवसेना पक्षवाढीत खुप मोठे योगदान होते. सामान्य शाखाप्रमुख ते आमदार असा प्रवास करणारे विजयराज शिंदे जिल्ह्यातील हिंदुत्ववादी चेहरा म्हणुन समोर आले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या "विजयरथ" रोखला होता.जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचा परिणाम म्हणुन त्यांना शिवसेनेतून वारंवार डावलल्या जात होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बुलडाण्यात सभा घेण्यासाठी  आले असता विजयराज शिंदे यांची बॅनरवरून सुद्धा हकालपट्टी केली होती.त्यामुळे संतापलेल्या विजयराज शिंदे यांनी सभा आटोपुन चिखलीकडे निघणाऱ्या आदित्य ठाकरे यांना येळगाव फाट्यावर थांबवून तिथेच दुसरी जंगी सभा घेत आदित्य ठाकरे यांचा  जाहीर सत्कार केला होता. कोणतेही पुर्वनिजोजन नसताना सुद्धा विजयराज शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनची जोरदार चर्चा जिल्हाभरात झाली होती. परंतु  प्रतापरावांशी असलेल्या मतभेदांमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापल्याने विजयराज शिंदे यांनी वंचितच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवत दुसऱ्या क्रमांकाची 41710 मते घेत जोरदार लढत दिली होती. या निवडणुकीत वंचित पेक्षा विजयराज शिंदे यांचा व्यक्तिगत संपर्क व त्यांची लोकप्रियता वरचढ ठरल्याचे बोलले जात होते. वंचितच्या तिकिटावर निवडणुक लढवत असतांनाही विजयराज शिंदे यांच्या खांद्यावरील भगवा रूमाल मात्र कायम होता; त्यामुळे शिंदे फार काळ वंचित सोबत राहण्याची शक्यता नव्हती. शिवसेनेतुन डावलल्यामुळे विजयराज शिंदे यांचे हिंदुत्वप्रेम लक्षात घेता ते लवकरच भाजपमध्ये जातील असे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात होते. आजच्या प्रवेश सोहळ्याने या अंदाजावर शिक्कामोर्तब झाले आहे.
 

विजयराज शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया..

विजयराज शिंदे यांनी बुलडाणा विधानसभा मतदार संघात केलेले विकासकार्य व त्याला असलेली हिंदुत्वाची जोड यामुळे जिल्हाभरात भाजपला मोठा फायदा होईल.
  संजय कुटे,आमदार ,प्रदेश सरचिटणीस भाजपा

कार्यकर्त्यांचा आग्रह,केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रिय नेतृत्वात विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश घेतला आहे. आपला जन्म हा हिंदुत्वासाठी झाल्याने  पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारुनयापुढे हिंदुत्वाचा विचार व भाजप वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.
 विजयराज शिंदे,माजी आमदार,भाजपा नेते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार