सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सध्या कोरोनाच्या काळामध्ये विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक कंपन्या सुद्धा प्रशानाच्या मदति करिता पुढे सरसावल्या

आरोग्य केंद्राला अनेक कंपन्या

Sudarshan MH
  • Aug 25 2020 6:49PM
वाड़ा - (मनीष गुप्ता )  स्थानिक पातळीवरील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक कंपन्या आता मदतरूपी काही ना काही भेट देतात. याचे एक उदाहरण आज वाडा तालुक्यातील कुडूस येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुडूस येथील खोसला प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लॅपटॉप व इतर उपकरणे भेट दिली, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱयांचे ऑफिस रिनोव्हेशन करून देण्याचे कामही हाति घेतले. खरं म्हणजे तालुक्यांमध्ये अनेक गोरगरीब रुग्ण मोठ्या प्रमाणात ही प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असतात आणि त्यांच्यासाठी सोयी सुविधांची कमतरता असल्या कारणाने अनेक रुग्ण हे दगावतात आधीच परिस्थितीशी झुंज देऊन गोरगरीब जनता खासगी रुग्णालयात जाण्यासाठी न परवडणारे असल्या कारणाने आपले उपचार हे सरकारी रुग्णालयातच करण्याची पाळी येत असते आणि अशातच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक अडचणींना तोंड देऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपचार देत असतात यामुळे प्रशासनाकडून सोयी सुविधा लवकर उपलब्ध होत नसल्याकारणाने स्थानिक पातळीवर सामाजिक संस्था व स्थानिक कंपन्यांच्या मदतीने छोटे छोटे उपक्रम राबवून  प्राथमिक आरोग्य केंद्राला गोरगरीब जनतेच्या सेवेकरिता असे उपक्रम राबवून  मदत केली जाते . असीच एक मदत आज वाडा तालुक्यातील कुडूस येथील खोसला कंपनीचे मालक राज खोसला यांना कुडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती समजल्यावर डॉक्टर समाधान पगारे यांच्याशी चर्चा केली  व लॅपटॉप आणि आवश्यक असलेल्या साहित्याची त्वरित मदतही केली, त्याचबरोबर डॉक्टर तपासत असलेल्या खोलीचे रिनोव्हेशन करून देण्याचेही काम करून देण्याचे हाती घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार