सूनबाई ला जिवानिशी मारणाऱ्या सासऱ्याला वजिराबाद पोलीसांनी पकडला
नांदेड दि.24(अरविंद जाधव) 19 ऑगस्ट रोजी आपल्या सुनबाईचा खून
नांदेड दि.24(अरविंद जाधव) 19 ऑगस्ट रोजी आपल्या सुनबाईचा खून आणि पत्नीला गंभीर जखमी करून पळालेल्या मारेकरी सासऱ्याला वजिराबाद पोलीसांनी पकडले. दि.23 ऑगस्ट रोजी नायगाव न्यायालयाने मारेकरी सासऱ्याला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
देगाव ता.नायगाव येथे 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास किसन विठोबा मोरे (65) आणि त्यांच्या पत्नीसोबत झालेल्या भांडणामध्ये त्यांची विधवा सुनबाई मिराबाई माधव मोरे (32) आली आपल्या हातातील वेळूच्या काठीने पत्नीला मारहाण करत होता. मग त्याने त्याच वेळूच्या काठीने सुनबाईच्या डोक्यात घाव घातले आणि ती खाली पडताच आपल्या हातातील काठी फेकून किसन मोरे देगाव येथून फरार झाला.
सर्वत्र गणेशस्थापनेची धामधूम चालू असताना ही वजिराबाद पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सुनबाईचा खून करुन पळून आलेला मारेकरी सासरा नांदेडमध्ये लपलेला आहे. याबाबत पोलीस उपअधिक्षक अभिजित फस्के , पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल पुंगळे, पोलीस कर्मचारी संतोष बेल्लूरोड, चंद्रकांत बिरादार, बबन बेडदे, शरदचंद्र चावरे, संजय जाधव आदींनी शहरातील कलामंदिर शेजारी असलेल्या एका लॉजमध्ये छापा टाकला. आपल्या सूनबाईचा खून करून किसन विठ्ठोबा मोरे त्याच दिवशीपासून या लॉजमध्ये राहत होता. किसन मोरेला पकडून वजिराबाद पोलीसांनी कुंटूर पोलीसांच्या स्वाधीन केले.
दि.23 ऑगस्ट रोजी कंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक करीमखान पाठण यांनी किसन मोरेला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने एका दिवसासाठी ती मंजूर करत उद्या दि.24 ऑगस्ट पर्यंत किसन मोरेला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प