सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अरूंद रस्ते व वाढती रहदारी ही आज रोजी महत्त्वाची समस्या - एड. विजय बाजड

बुलडाणा : मेहकर शहरामध्ये अरूंद रस्ते व वाढती

Sudarshan MH
  • Aug 24 2020 2:15PM

बुलडाणा :  (योगेश शर्मा)  मेहकर शहरामध्ये अरूंद रस्ते व वाढती रहदारी ही आज रोजी महत्त्वाची समस्या आहे. यावर कायमची उपाययोजना करावयाची असेल तर; सर्वात आधी राजकारण बाजुला ठेवुन रस्त्याचे बाजुला असणारे अतिक्रमण कुणाचे ही असो ते काढून तात्काळ तो रस्ता बांधून तयार करावा, जेणेकरून परत त्या ठिकाणी कुणी अतिक्रमण करू नये. तसेच रस्ते बनवतांना त्यामध्ये दर्जा असावा; नाहीतर मेहकरमध्ये रस्ते बनल्यावर एक वर्षही टीकत नाहीत. केवळ कागदोपत्री व ऊद्घाटनाचे फोटो काढून आपण किती कर्तव्यदक्षपणे काम करतो याचा खोटा मोठेपणा मिरवण्यासाठीच जाहीराती केल्या जातात. मल्टीस्पेशालीटी ते रामनगर, सरकारी ग्रामिण रूग्णालयाकडे जाणारा डिपी रोड बनवून केवळ बिले काढलीत रस्ता पंधरा दिवसही टिकला नाही. तसेच मेहकर शहराचे आराध्य दैवत शारंगधर बालाजी मंदीराकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनही जाऊ शकत नाही. व रस्त्यावर दुतर्फा हातगाड्या लावुन आधीच लहान असलेला रस्ता लहान केल्या जातो त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते म्हणुन हातगाडीवाल्यांना व्यवसायासाठी दुसरी जागा देवुन रस्ता मोकळा करावा. तसेच मेहकरमध्ये पक्ष व सत्ता कोणतीही असो एकाही रस्त्याचे काम दर्जेदार झालेले नाही हे एक कटु सत्य आहे.कोणत्याच भागात जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. पेशंटला ईमर्जन्सी असेल तर, बस-स्टँड ग्रामीण रूग्णालयापर्यंत जिवंत जाणे कठीण आहे एवढा खराब रस्ता आहे. तरीही दुरूस्ती नाही. मेन रोडवरही पोलीस स्टेशन समोर अवैध प्रवासी वाहतुक करणारी वाहणे उभी राहून वाहतुक जाम होते. परंतु कोणतीही कार्यवाही नाही कोर्टाकडे जाणा-या रस्त्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाटीकेजवळ चौकात दुचाकी लावुन लोक ट्रॅफिक जाम करतात. परंतु तरीही कुणावर कार्यवाही होत नाही महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींचे मंदीरात जाण्यासाठी रस्ता मोकळा राहत नाही. त्यामुळे बाहेरून योणा-या पर्यटक व भक्तांना त्रास सहन करावा लागतो व गावाचे नाव खराब होते त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत असतांना राजकारण बाजुला ठेवुन पोलीसांकडून तरी मुंबई पोलीस अधिनियमाप्रमाणे कार्यवाही होऊन रस्ते मोकळे होऊन मिळावेत ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.  तसेच काही ठिकाणी रस्त्याचे बाबतीत  बांधकाम विभाग म्हणते ते नगरपालीकेकडे आहे, तर नगरपालीका म्हणते बांधकाम विभागाकडे आहे. परंतु काम कुणाकडेही असो दोन्ही विभाग जनतेसाठीच आहेत. त्यामुळे रस्ते होणे महत्वाचे आहे. म्हणुन मेहकरमधील अरूंद रस्त्याची समस्या कायमची संपवायची असेल तर प्रशासनाला, नगरपालीकेला, लोकप्रतिनिधिंना व पोलीसांना कठोर निर्णय घ्यावे लागतील व राजकारण बाजुला ठेवुन रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन मोठे व दर्जेदार रस्ते तयार करावे लागतील व अतिक्रमण धारकांना त्यांचे व्यवसायासाठी कुठेतरी वेगळे मार्केट तयार करून द्यावे लागेल तरच ही समस्या सुटु शकेल. असे मत एड. विजय बाजड यांचे आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार