सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री जीवदानी कोव्हीड रुग्णालयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकापर्ण

कोरोना मुक्तीसाठी श्री जीवदानी रुग्णालय महत्वाची जबाबदारी पार पाडणार - पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला विश्वास

Sudarshan MH
  • Aug 22 2020 11:11AM
वसई विरार :  ( मनीष गुप्ता ) जिल्ह्यातील  कोव्हीड  बाधितांना कोव्हीड मुक्त करण्यासाठी श्री जीवदानी रुग्नालय सज्ज झाले असुन कोरोना मुक्तीसाठी 
श्री जीवदानी कोव्हीड  रुग्णालय महत्वाची जबाबदारी पार पडणार असा विश्वास राज्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. 
 चंदनसार विरार (पूर्व ) येथील 100 बेडच्या श्री जीवदानी कोव्हीड रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी खा. राजेंद्र गावित सर्वश्री आमदार क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, रवींद्र फाटक जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, वसई -विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री. गंगाथरन तसेच पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 उद्या अतिशय शुभ दिवस गणरायाच आगमन होत आहे. आणि त्याच्या पूर्व संध्येला आज आपल्या वसई-विरार वासियांच्या दृष्टिकोनातून एक सुसज्ज अस 100 खाटांच्या कोव्हीड हॉस्पिटलचे लोकार्पण   करण्यात आले  आहे.
या रुग्णालयात 100 आय.सी.यु ,25 व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब,आर टी ,पी सी आर लॅब तसेच एक्सरे आणि सोनोग्राफी ची सुविधा आणि 2 ऑपरेशन थेटर आदी सुविधा येथे रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या रुग्णालया मध्ये   25 खाटाची ऑक्सिजनची व्यवस्था असलेले  हे हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. गेल्या काही वर्षापूर्वीच महापालीकेच्या माध्यमातून ही इमारत या ठीकाणी प्रगती पथावर होती आणि अतिशय तातडीने या ईमारतीच काम पूर्ण करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार वासीयांच्या सेवेमध्ये रुग्णालयाची सेवा  सूरू झाली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली रूग्ण सेवा या ठीकाणी उपलब्ध होऊन जास्तीत जास्त रुग्ण कोरोना मुक्त होतील असा विश्वासहि पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार