सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बोइसर- निष्पाप जीवांचे बळी जाण्याखेरीज अश्या कंपन्याना टाळे लावण्यात यावे’ – जनतेतून एकच आक्रोश

रासायनिक कारखान्यांमधील स्फोटाच्या घटना वरच्यावर समोर येत असतात

Sudarshan MH
  • Aug 21 2020 4:37PM
पालघर :- (मनीष गुप्ता ) रासायनिक कारखान्यांमधील स्फोटाच्या घटना वरच्यावर समोर येत असतात. दि.17 ऑगस्ट 200 रोजी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील नांदोलीआ ऑरगॅनिक केमिकल्स प्रा.ली.या रासायनिक कंपनीमधील रियाक्टरचा प्रंचड मोठा स्फोट होऊन पालघर जिल्ह्यातील जवळपास 15 ते 20 किमी दूरवर पर्यंतचा भाग हादरला होता. या भीषण अशा स्फोटामध्ये 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 कामगार गंभीर जखमी झाले.

तारापूरचा देशातील सर्वाधिक प्रदूषित औद्योगिक वसाहतीमध्ये समावेश होतो. गेल्या आठवड्यातच राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि 221 कंपन्यांना प्रदूषण केल्याप्रकरणी जबाबदार धरत पर्यावरणीय भरपाई म्हणून 160 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मागील वर्षभरामध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये जवळपास 10 स्फोटांच्या घटना घडल्या असून, यामध्ये अनेक निष्पाप कामगारांचे बळी गेले आहेत. तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. स्फोटाची दुर्दैवी घटना घडते..काही दिवस बातम्या आणि हळहळ व्यक्त होते..चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले जाते परंतु नंतर याचे काहीच होत नाही आणि तोपर्यंत पुन्हा एक नवीन स्फोटाची घटना घडते..वर्षांनुवर्षे इथे हेच सुरू आहे पण हे सर्व थांबविण्यासाठी यावर ठोस असा काहीच निर्णय आणि उपाययोजना होत नाहीत.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारख्यानांमध्ये वारंवार घडणाऱ्या स्फोटांच्या मालिकेमुळे तसेच प्रचंड प्रदूषणामुळे बोईसर-तारापूर व आसपासचा 15-20 किमी परिघातील भाग हा ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असून कधीही भोपाळ किंवा बैरुत सारखी महाभयानक दुर्घटना घडू शकते. कमी खर्चात अधिक उत्पादनाच्या हव्यास्यापोटी कंपनी मालक हे आपल्या कारखान्यामध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करतात. प्रशिक्षित कामगारांऐवजी कमी पगारात कंत्राटी परप्रांतीय कामगारांना प्राधान्य देणे, जुनाट मशनरी आणि उपकरणे वापरणे, आगप्रतिरोधक यंत्रणा नसणे, तसेच जल व वायू प्रदूषण नियंत्रण प्रक्रिया नियमानुसार नसणे इत्यादी विविध कारणांमुळे या अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित अधिकारीसुद्धा कारखाना मालकांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील पर्यावरण अभ्यासक व स्थानिक नागरिक सातत्याने करत आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीच्या आजूबाजूचा प्रदेश हा सागरी किनारपट्टी आणि डोंगराळ असून पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे स्फोट आणि प्रदूषण यामुळे या भागाला धोका संभवत असून या घटना थांबविण्यासाठी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आपल्या आदेशानुसार औद्योगिक-पर्यावरणीय क्षेत्रातील तज्ञ यांची एक समिती नेमून सदर समितीमार्फत रासायनिक कारखान्यांची संपूर्ण तपासणी होऊन चौकशी करण्यात यावी व धोकादायक असलेले कारखाने बंद करण्यात यावेत, अशी विनंती जनतेकडून केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार